बेळगावात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ : केरी चेकनाक्मयावरील यंत्रणा मजबूत करण्याची आवश्यकता : वाहतुकीवरही नियंत्रण ठेवण्याचीही गरज
डिचोली/प्रतिनिधी

गोवा राज्यात करोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच शेजारील बेळगाव जिह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढतत असल्याने आता राज्यात बेळगाव येथून येणारी भाजी व इतर सामानाच्या वाहतुकीवर राज्य सरकारने करडी नजर ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा राज्यातील आज सुधारलेली परिस्थिती पुन्हा धोक्मयाखाली येण्यास वेळ लागणार नाही व आतापर्यंत राज्य सरकार व राज्यातील लोकांनी कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राखण्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांवर पाणी पडण्याची शक्मयता आहे.
बेळगाव जिह्यात गुरुवार 16 एप्रिल रोजी एकदमच 17 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने या जिह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता 36 वर पोहोचली आहे. बेळगाव हे गोव्यापासून केवळ 100 कि. मी. अंतरावर असून सध्या गोव्यात या लॉकडाऊन काळात मोठय़ा प्रमाणात भाजीची आवक ही बेळगाव येथून होत आहे. मोठय़ा प्रमाणात भाजीची वाहने गोव्यात बेळगाव येथून येत असल्याने बेळगाव सध्या कोरोनाचा धोकादायक भाग बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात येणाऱया भाजीच्या व इतर सामानाच्या गाडय़ांचे व आतील मालासह चालक व सहचालकांची गंभीर वैद्यकीय तपासणी होणे आज काळाची गरज बनली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात व देशात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर गोवा राज्याच्या सर्व सीमा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सील करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात भाजी व इतर मालाच्या गाडय़ा सीमाभागात अडकून पडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या कायद्यात काही प्रमाणात सुट देण्यात आल्यानंतर भाजीच्या व किराणा मालाची वाहने मोठय़ा प्रमाणात गोवा राज्यात दाखल झाल्या होत्या. मात्र त्यानंतर गोवा राज्यात भाजीपाला घेऊन येणाऱया वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
केरी नाक्मयावर होते माफक तपासणी

दिवसाला फलोत्पादन महामंडळाला पुरवठा करणाऱया वाहनांची संख्या जेमतेम 50 च्या घरात असते तर खासगी वाहनातून भाजी गोव्यात आणणाऱया वाहनांची संख्या तीप्पट असल्याचे समजते. बेळगाव येथून येणाऱया भाजीच्या मालाची काही तपासणी होत नाही. तर वाहनांवरील चालकाची केरी येथे आरोग्य खात्यांच्या खास उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्मयावर थर्मल गनच्या सहाय्याने ताप तपासला जातो. त्याव्यतिरिक्त कोणतीही तपासणी होत नाही. तोंडी काही प्रश्न विचारले जातात. नाक्मयावरील पोलिसांकडून गाडीची माहिती तसेच चालक व सहचालकाची माहिती नोंदवून घेतली जाते.
भाजी भरणाऱया व्यक्तींची तपासणी झाली आहे का ?
केवळ याच आधारावर गाडय़ा गोव्यात सोडल्या जातात. मात्र बेळगाव येथे भरण्यात येणारी भाजी कशापद्धतीच्या व्यक्तींकडून भरण्यात आली आहे, याची कोणतीही माहिती राज्यात भाजी घेऊन येणाऱया भाजीवाल्यांकडे नसते. भाजी वाहनांमध्ये भरणाऱया माणसांची कोरोना व्हायरससंबंधी कोणतीही शाश्वत तपासणी अथवा चाचणी झालेली आहे का ? तसेच सदर भाजी भरणाऱया माणसांशी कोरोनाबाधीत व्यक्तींचा संपर्क आला असल्यास काय ? अशा संशयास्पद व्यक्तींकडून वाहनांमध्ये भरणाऱया भाजीला आणि त्या भाजीमधून गोव्यातील लोकांना परिणाम भोगावे लागण्याची भीती नाकारता येत नाही. यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
भाजी दलालांशी संपर्क करून भाजीची वाहतूक
बेळगाव येथून भाजीपाला गोव्यात आणणाऱया एका भाजी व्यवसायिकाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या आम्ही भाजीसाठी बेळगावात जात नाहीत. फोनवर भाजीची ऑर्डर बेळगावतील दलालांकडे दिल्यानंतर गोव्यातून भाजीची गाडी व केवळ एक चालक बेळगावात पाठवला जातो. सदर गाडीत सहचालकही नसतो. तो गाडी घेऊन बेळगावात जातो व संबंधित दलालाशी संपर्क करून ऑर्डर दिलेला भाजीमाल घेऊन गोव्यात येतो. त्याठिकाणी भाजी भरणाऱया लोकांशी त्याचा संपर्क होतो. तसेच सदर भाजी भरणारे लोक आरोग्याच्यादृष्टीने कसे आहेत याची कोणतीही जाणीव मिळू शकत नाही.
सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज
सध्या गोवा राज्यात भाजीची मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असल्याचे आढळून आले आहे. अनेकांनी परवाना मिळवून ते आज बेळगावातून भाजी आणत आहेत. त्यामुळे गोव्याच्या बाजारपेठेत बेळगावच्या भाजीची आवक वाढली आहे. सध्या बेळगावात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढल्याने बेळगाव सारख्या भागातून गोवा राज्यात येणाऱया भाजीचीही शाश्वती नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकारने वेळीच ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा आतापर्यंत गोवा राज्य या व्हायरसच्या संसंर्गातून सुरक्षित राखण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य, पोलीस व इतर यंत्रणेने केलेल्या प्रयत्नांवर पाणी पडण्याची शक्मयता नकारता येत नाही.