जिल्हय़ात मंगळवारी तब्बल 51 नवे रुग्ण, बेळगाव तालुक्मयातील 33 जणांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
रोज कोरोनाची किती जणांना बाधा झाली याकडेच अधिक लक्ष दिले जात आहे. राज्य सरकारच्या हेल्थ बुलेटिननुसार जिल्हय़ामध्ये मंगळवारी 51 रुग्ण आढळले. त्यामध्ये बेळगाव तालुक्मयातील तब्बल 33 जणांचा समावेश आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्मयाला मोठा दणका बसला आहे. मुंबई, पुणे कनेक्शन असले तरी पहिल्यांदाच इतका मोठा आकडा सामोरा आला आहे. यामुळे पुन्हा धास्ती वाढली असून आरोग्य विभाग पुन्हा जोमाने कामाला लागले आहे.
परराज्यांमधून आलेल्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. मात्र क्वारंटाईनमध्ये असलेले निम्याहून अधिक जण कोरोना पॉझिटिव्ह निघू लागले आहेत. यामुळे क्वारंटाईनमध्ये असलेल्यांच्या मनामध्येही भीती वाढू लागली आहे. एक दिवसापूर्वीच अधिक रुग्ण सापडण्याची शक्मयता आरोग्य विभागाने व्यक्त केली होती. अनेक जण संशयित असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मंगळवारच्या हेल्थ बुलेटिनकडे आरोग्य विभागासह साऱयांचेच लक्ष लागले होते.
मंगळवारी जिल्हय़ामध्ये 51 जण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्हय़ाचा कोरोना बाधितांचा आकडा 211 वर पोहोचला आहे. बेळगाव तालुक्मयात तब्बल 33 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये सर्वात जास्त अतिवाडमध्ये रुग्ण आढळले आहेत. अतिवाड 15, मुतगा 2, सांबरा 1, सावगांव 1, उचगाव 3, सुळगा (हिंडलगा) 2, हंदिगनूर 1, मार्कंडेयनगर 1, नेहरुनगर 1, भेंडीगेरी 1, बाळेकुंद्री खुर्द 1, बाळेकुंद्री बुद्रुक 1, याचबरोबर शहरामध्ये 3 असे रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.
परराज्यांमधून येणाऱयांची संख्या वाढत चालली आहे. हा आकडा जसा वाढेल तशी कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. बेळगाव तालुक्मयात 1 हजाराच्या आसपास क्वारंटाईन म्हणून नागरिकांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये आता 33 रुग्ण तालुक्मयात आढळले आहेत. मुंबई, पुणे, धारावी, बेंगळूर येथून येणाऱयांची संख्या अधिक आहे. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. मुंबई, पुणेमधून आलेल्यांना सर्वात जास्त कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
रुग्ण क्रमांक 3668, 3669, 3670, 3671, 3672, 3673, 3675, 3676, 3677, 3678, 3679, 3680, 3681, 36832, 3683, 3684, 3685, 3686, 3687, 3688, 3689, 3690, 3691, 3692 यासह जिल्हय़ात 51 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात मंगळवारी तब्बल 388 जण नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यात 3 हजार 796 कोरोनाबाधितांचा आकडा झाला आहे.
बेळगाव जिल्हय़ात पहिल्यांदाच एकाच दिवशी 51 जण सापडले आहेत. बेळगाव जिल्हय़ामध्ये 204 जण सापडले आहेत. तर बागलकोट जिल्हय़ातील 8 जणांचा समावेश आहे. अजूनही काही जणांचे अहवाल यायचे असून आता त्यामध्येही कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्मयता नाकारता येत नाही.
जिल्हय़ात आतापर्यंत 117 जण कोरोनामुक्त
मंगळवारी 51 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. मात्र 9 जण बरेही झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होण्याचा आकडा 117 वर पोहोचला आहे. तर 85 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्हय़ामध्ये कोरोनामुक्त होणाऱयांची संख्याही अधिक आहे. मंगळवारी 9 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधून घरी जावू देण्यात आले आहे.