प्रतिनिधी /फोंडा
घाडीवाडा-सुर्ल येथील श्री मल्लीकार्जून देवस्थानचा नवमी दसरोत्सव बुधवार 20 रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक विधी व रात्री 9 वा. बालकीर्तनकार ह. भ. प. ब्रह्मय सुर्लकर याचे कीर्तन होणार आहे. ब्रह्मय हा प्रसिद्ध कीर्तनकार सुहासबुवा वझे यांचा विद्यार्थी असून आत्तापर्यत त्याने सत्तरहून अधिक किर्तने सादर केली अहेत. गोव्याच्या विविध भागांत तसेच महाराष्ट्रात त्याची किर्तने झाली आहेत. कीर्तनानंतर आरत्या व तीर्थप्रसाद होतील. भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे कळविण्यात आले आहे.