ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘कोव्हिशिल्ड’ ची कोरोनावरील लस उपचार आणि प्रतिबंधामध्ये 90 टक्के परिणामकारक असल्याचे चाचण्यांमध्ये सिद्ध झाले आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरीस या लसीला केंद्र सरकारची मान्यता मिळेल. त्यावेळी भारतात 10 कोटी लस उपलब्ध होतील, असे सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांनी म्हटले आहे.
पूनावाला म्हणाले, ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्राझेनेकाच्या या लसीने इंग्लंड आणि ब्राझीलमध्ये तिन्ही टप्प्यातील चाचण्या पार पाडल्या. या चाचण्यांमध्ये ही लस 90 टक्के परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात ही लस पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट तयार करत आहे. गेल्या दोन महिन्यांत देशात 4 कोटी लस तयार झाल्या असून, या लसीची किंमत प्रतिव्यक्ती 600 रुपयांपर्यंत असू शकते.
या लशीच्या साठवणुकीसाठी उणे 70 अंश सेल्सीयस तापमान आवश्यक आहे. त्यामुळेसाठवणूक आणि वाहतूक सुविधा आणि दर यादोन्ही बाजूंनी विचार केला तर कोव्हिशिल्डभारतासाठी सर्वार्थाने उपयुक्त असणार आहे.