बेळगाव तालुक्यातील 12 जणांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली तरी दररोज रुग्ण आढळत आहेत. मंगळवारीही जिह्यामध्ये 18 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 12 जणांचा समावेश असून ग्रामीण भागातील 7 आणि शहरातील 5 जणांचा समावेश आहे. यामुळे अजूनही कोरोनाबद्दल दक्षता बाळगणे गरजेचे असून नियमांचे पालन प्रत्येकाने करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. तज्ञांनी जानेवारीपर्यंत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्मयता वर्तविली आहे. त्यामुळे प्रत्येकानेच आपली जबाबदारी म्हणून सर्व खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. सध्या कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होत आहेत, ही दिलासादायक बाब आहे. असे असले तरी अजूनही दक्षता बाळगणे गरजेचे आहे.
मंगळवारी बेकिनकेरे, हलभावी, सांबरा-एटीएस, हिंडलगा, बैलूर या गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत. शहरामधील भाग्यनगर, सदाशिवनगर यासह इतर परिसरात रुग्ण आढळले आहेत. मागील आठवडय़ाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, दुर्लक्ष केल्यास हे प्रमाण वाढण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे.