बेळगाव : मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तेव्हा प्रत्येकाने मतदान करावे याबाबत मनपा स्वच्छता कर्मचाऱयांनी आणि इतर कर्मचाऱयांनी शहरातून रॅली काढून मतदान जनजागृती केली आहे. दररोज हाती कचऱयाची बुट्टी घेणारे कर्मचारी यावेळी मतदान करा, असे जनजागृतीचे फलक घेऊन जाताना दिसत होते. जिल्हा स्वीप समितीच्यावतीने या जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. स्वीप समितीचे अध्यक्ष व जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. आणि महानगरपालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी ध्वज दाखवून या रॅलीला चालना दिली. धर्मवीर संभाजी चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडेबाजार, शनिवार खूटमार्गे सरदार्स मैदानावर रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी महानगरपालिकेच्या 100 हून अधिक कर्मचाऱयांनी यामध्ये भाग घेतला होता. याचबरोबर पी. बी. दुडगुंटी, राघवेंद्र अण्णीकेरी, रोहन कोकणे, पी. पी. देशपांडे, ए. पी. बसनाळ, आय. डी. हिरेमठ यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Trending
- श्वानाला मिळाली मानद पदविका
- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात स्फोट, 6 ठार
- प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारा
- एलॉन मस्क पुन्हा बनले जगातील श्रीमंत व्यक्ती
- चार गॅरंटींची आज घोषणा?
- पर्यटकांमुळे अंटार्क्टिकात वितळतोय बर्फ
- आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोराला कंठस्नान
- तांत्रिक बिघाडामुळे चामराजनगरजवळ कोसळले प्रशिक्षण विमान