बेंगळूर : कोरोनाकाळात व राज्यातील पोटनिवडणुकीत सेवा बजावल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी दिले आहेत. कोरोनाकाळात सेवा बजावत असताना आणि पोटनिवडणुकीत काम केलेल्या अनेक शिक्षक आणि प्राध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याची शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी गंभीरपणे दखल घेतली असून त्यांनी अधिकाऱयांना याबाबत त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. एप्रिल 2021 पासून आतापर्यंत शिक्षक आणि प्राध्यापकांचा वयासह कोणत्या कारणाने मृत्यू झाला, याचा सविस्तर अहवाल पाठविण्याची सूचना सुरेशकुमार यांनी शिक्षण खात्याचे आयुक्त आणि पदवीपूर्व शिक्षण सचिवांना दिली आहे.
Previous Article‘तौक्ते’ चा राज्याला जबरदस्त तडाखा
Next Article मुलांसाठी बेड्स राखीव ठेवावेत
Related Posts
Add A Comment