ऑनलाईन टीम / मुंबई :
मराठी भाषेवरून पुन्हा एकदा मनसेचा वाद पेटल्याचे दिसून येत आहे. ‘नो मराठी नो ॲमेझॉन मनसे’ ची मोहीम अधिक आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनद्वारे विविध ठिकाणी लावण्यात आलेली पोस्टर्स फाडले. हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे.
याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसे सचिव यांना कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस सत्र न्यायालयाकडून पाठवण्यात आली आहे. या नोटीसीमध्ये राज ठाकरे यांना 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा वाद अजून वाढण्याचे चिन्ह आहे.
ॲमेझॉनच्या ॲपमध्ये मराठी भाषा असावी अशी मनसेचे मागणी आहे. मात्र मनसेची ही मागणी पूर्ण करण्यास ॲमेझॉनने स्पष्टपणे नकार दिला आहे. परिणामी ॲमेझॉन आणि मनसेचा वाद आता आता न्यायालयात पोहोचला आहे.
- मनसे नेते अखिल चित्रे म्हणाले…

दरम्यान, मनसे नेते राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अॅमेझॉनला महाराष्ट्रात व्यवसाय करु देत आहे हे विसरता कामा नये. अॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार हे नक्की आहे. तसेच अशा नोटीसला मनसे घाबरत नाही. मराठी भाषेसाठी कोणत्याही केसेस आंगावर घेण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.