क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळुर येथे 37 व्या अखिल भारतीय सबज्युनियर राष्ट्रीय ऍक्वेटीक जलतरण स्पर्धेत बेळगावच्या अद्वैत दळवीने कांस्य पदक पटकाविले तर वेदांत मिसाळे याला या स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
सदर स्पर्धेत अद्वैत दळवीने व्ही गटात दहा वर्षाखालील विभागात 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत कांस्य पटकाविले. दिल्ली येथे
होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे वेदांत मिसाळे याने व्ही गटात 10 वर्षाखालील विभागात 10 मीटर बटरफ्लाय स्पर्धेत पाचवे स्थान मिळविले. या दोन्ही स्पर्धकांचे डॉ. प्रभाकर कोरे व प्रशिक्षक उमेश कलघटगी यांनी कौतुक केले. दोन्ही जलतरणपटूंना प्रशिक्षक नितीश कुडुचकर, अक्षय सेरेगार, अजिंक्मय मेंडके, गोवर्धन काकतीकर यांचे बहुमोल मार्गदर्शन तर उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, डॉ. प्रभाकर कोरे, केएलईचे कुलगुरू विवेक सावजी, अविनाश पोतदार, सुधीर कुसाने यांचे प्रोत्साहन लाभत आहे.