प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्गचे सुपुत्र, रायफल शुटिंग असोशिएशन, गोवाचे सरचिटणीस तथा आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक ऍड. विक्रम भांगले यांची भारतीय रायफल असोसिएशनच्या ‘मानद सचिव’पदी सलग तिसऱयांदा निवड झाली आहे. त्यांची ही निवड बिनविरोध झाली हे विशेष होय.
मोहाली-चंदीगड येथे आज रोजी संपन्न झालेल्या भारतीय राष्ट्रीय रायफल संघाच्या निवडणूकीत ऍड. भांगले यांची नेमबाजी महासंघाच्या या महत्वाच्या पदावर निवड झाली आहे. सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवास्पद बाब म्हणून संपूर्ण क्रीडा वर्तुळात या निवडीकडे पाहीले जाते.