प्रतिनिधी /बेळगाव

रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी, सचिव विनयकुमार बाळीकाई व खजिनदार सुनील तडाणी आणि त्यांचे सहकारी शनिवार दि. 17 रोजी सायंकाळी 6 वाजता अंगडी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पदभार स्वीकारणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल रोटे. जॉर्सन फर्नांडीस उपस्थित राहणार आहेत.
अरविंद खडबडी हे तेल आणि गॅस उद्योगात गेल्या 34 वर्षांपासून कार्यरत आहेत. अनेक नामवंत कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. ओएनजीसी व्यवस्थापनाने वॉटर इंजेक्शन प्लान्टसाठी त्यांची निवड केली. आजवर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तेल आणि वायू या क्षेत्रातील त्यांचा अभ्यास वाखणण्याजोगा असून याचाच विकास करण्यासंदर्भात त्यांना कंपनीने चीनलाही पाठविले होते. ते ब्रिजपटू असून बॅडमिंटन आणि टेनिसची त्यांना आवड आहे. कारगिल, गुजरात भूकंप, लातूर भूकंप, त्सुनामी अशा आपत्तींसाठी त्यांनी निधी संकलन केला आहे.
विनयकुमार बाळेकाई हे फार्मसीचे पदवीधर असून पद्मश्री मेडिकल्स हे दुकान त्यांनी सुरू केले. हायटेक मोटर्स ऍण्ड ऑटोमोबाईल्स प्रा. लि. या तिचाकीची डिलर्सशीप त्यांच्याकडे आहे. ते रोटरीचे सक्रिय सदस्य असून जितोचे संस्थापक सदस्य आहेत. दक्षिण भारत जैनसभेचेही ते सदस्य आहेत. बेलगाम बुलेटगुरु, बेलगाम ऑटोमोबाईलचे ते सदस्य असून पश्चिम घाट आणि हिमालयाच्या रक्षणार्थ ते नेहमी मोहिमेवर जातात. अनेक गरजू गरीब मुलांची त्यांनी फी भरली आहे. 73 वेळा त्यांनी रक्तदान केले असून नेत्रदानासाठी ते जागृती करतात. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
सुनील तडाणी हे बीबीए पदवीधर असून क्यावसायिक गुंतवणूकदार आहेत. रोटरीमध्ये त्यांनी 2016 मध्ये प्रवेश केला. 2018-19 मध्ये ते कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर होते. दानम हा निराधारांसाठीचा प्रकल्प त्यांनी राबविला.