आधुनिक कवी, नाटककार, कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून आचरणात
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज

बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या मराठी टीचर्स टेनिंग कॉलेजमध्ये जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजच्या प्राचार्या एच. पी. परुळेकर होत्या. प्रा. एम. के. पाटील, प्रा. एम. बी. हुंदरे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी मराठी विषयाचे प्रा. एम. बी. हुंदरे यांनी ‘विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती’ ही कविता सादर केली. मराठीमधील आधुनिक कवी, नाटककार, कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले. प्रा. एच. पी. परुळेकर यांनी कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्याला लाभलेले योगदान कथन केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
चन्नम्मा विद्यापीठ मराठी विभाग

रणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त गंथ समिक्षा सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. मनीषा नेसरकर होत्या. व्यासपीठावर प्रा.डॉ.चंद्रकांत वाघमारे, प्रा.डॉ.विनोद गायकवाड, डॉ. मैजुद्दीन मुतवल्ली, संजय कांबळे उपस्थित होते.
प्रारंभी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मराठी विभागातील पीएचडी प्रथम व द्वितीय वर्षाच्या 9 विद्यार्थ्यांनी गंथ समिक्षा केली. यावेळी प्रत्येकाला प्रमाणपत्र व पहिल्या पाच जणांना ग्रंथ देऊन गौरविण्यात आले.
प्रथम किरण होनगेकर व पद्मश्री गावडा, द्वितीय तेजस्विनी कांबळे, तृतीय पल्लवी कदम व उत्तेजनार्थ अंकुश पालेकर व संतोष मादाकाचे यांना ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. महादेव खोत, सतीश जाधव, नागराज हुरुडे यांनी ग्रंथ समीक्षा सादरीकरण केले. यावेळी राणी हिरोजी, मयूरी मोहिते, अनिल कांबळे, पूजा कोले उपस्थित होते. पद्मजा भांदुर्गे व प्रभा आजरेकर यांनी सूत्रसंचालन केले.
म. ए. समिती शहापूर विभाग

शहापूर विभाग म. ए. समितीच्या वतीने रामलिंगवाडी येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरात जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे ज्ये÷ कार्यकर्ते शिवाजी हावळाण्णाचे होते.
प्रारंभी प्रतिमा पूजन सुधाकर भांदुर्गे, सुधीर नेसरीकर, राजकुमार बोकडे, मनोहर शहापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगरसेवक राजू बिर्जे, मोहन चिगरे, राजकुमार बोकडे, गजानन शहापूरकर यांनी आपल्या मनोगतांतून विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण द्या, असे आवाहन केले. शाळा क्र. 25 च्या मुख्याध्यापिका मोडक यांनी मातृभाषेतून शिक्षण दिल्यास मुलांची प्रगती अधिक होते, असे सांगितले. सर्व मान्यवरांच्या हस्ते मराठी मुलांची शाळा क्र. 25 व न्यू गर्ल्स हायस्कूलच्या मराठी शाळेतील 80 हून अधिक विद्यार्थ्यांना साहित्य देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सुनील बोकडे, संजय पवार, जोतिबा चौगुले, कुणाल कोचेरी, चंद्रकांत मजुकर, कपिल बिर्जे, विजय डी., नागेश राकेश सावंत, अभिजित मजुकर, रजत बोकडे, रवी जाधव, रणजित हावळाण्णाचे, रवी पवार उपस्थित होते.
चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटना

चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेच्यावतीने रामदेव गल्ली येथील कार्यालयात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक थोरात होते.
उमाजी शिरगावकर यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक पी. सी. पाटील यांनी केले. सचिव एकनाथ पाटील व उपाध्यक्ष अशोक थोरात यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. एम. पी. पाटील व अशोक थोरात यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी सुनील पवार, सुरेश राजगोळकर, महेश कत्यान्नावर, भागोजी गावडे, मारुती गावडे, छाया पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. सौरव टोपले यांनी आभार मानले.
कोरे गल्ली गणेशोत्सव मंडळ

गोवावेस कोरे गल्ली येथील गणेश उत्सव मंडळाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. मंडळाचे सेपेटरी महेश पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवाजी हावळाण्णाचे यांनी मराठी मातृभाषेतून शिक्षण या विषयी मार्गदर्शन केले. सुधीर नेसरीकर, गजानन शहापूरकर, मंडळाचे अध्यक्ष कल्लाप्पा हंडे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी मंडळाचे कार्यकर्ते भाऊ मजुकर, नागेश कुंडेकर, मनोहर शहापूरकर, अवधूत कुटे, सत्यजीत पाटील, शंकर कुरंगे, समित पाटील, गजानन मुचंडी, रणजित हावळण्णाचे, सुधाकर भांदुर्गे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.