प्रतिनिधी/ बेळगाव
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठातून वैशाली राघवेंद्र कुलकर्णी यांनी पीएचडी मिळविली आहे. त्यांनी कॉम्प्युटर सायन्स विषयावर ‘ऍन इन्व्हेस्टिगेशन ऑफ बायो इन्स्पायर्ड नोड लोकॅलिझेशन इन वायरलेस सेंसर नेटवर्क’ यावर प्रबंध सादर केला होता. सध्या त्या बेंगळूर येथे एम. एस. रामिहा युनिव्हर्सिटी ऑफ ऍल्पाड सायन्सेस’ या कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. भाग्यनगर येथील रहिवासी एम. आर. कुलकर्णी यांच्या त्या कन्या आहेत.