यंदे खुट रोडवरील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या यंदे खुट रोडवरील कचऱयाची वेळेत उचल होत नसल्याने कचरा समस्या गंभीर बनत आहे. येथील रस्ता चकाचक झाला आहे. मात्र रस्त्यावरील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष झाल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहराची एकीकडे स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू आहे. तर दुसरीकडे शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरील कचरा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.
यंदे खुट मार्गावर प्लास्टिक, कागद व इतर खाद्यपदार्थ टाकण्यात आल्याने कचऱयाचा ढिग साचला आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱया नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कचऱयाची वेळेत उचल होत नसल्याने त्यावर भटकी जनावरे फिरत आहेत. शिवाय कचरा इतरत्र पसरला आहे. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांत झालेल्या वादळी पावसामुळे कचरा विखुरला जावून दुर्गंधीत वाढ झाली आहे. त्यामुळे कचऱयाची उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
प्रशासन उदासीन
या मार्गावरून पश्चिम भागातील नागरिकांसह चंदगड तालुक्मयातील प्रवाशांचीही वर्दळ असते. मात्र रस्त्यावर अस्वच्छता निर्माण झाल्याने प्रवाशांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले व इतर साहित्य विकणारे विपेते बसलेले असतात. त्यामुळे कचऱयात वाढ होत असते. शहरात निर्माण होणाऱया कचऱयाचे व्यवस्थापन व विल्हेवाट लावण्याबाबत प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच शहरात कचऱयाची समस्या निर्माण होत आहे.