इटलीतील रेसिया सरोवर
इटलीतील ‘रेसिया सरोवर’ लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. तसेही हे सरोवर स्वतःच्या बर्फाळ पाण्यात असलेल्या 14 व्या शतकातील एका चर्चच्या मीनारसाठी प्रसिद्ध आहे. पण सरोवरात एका हरवलेल्या गावाचे अवशेष मिळाल्यावर लोक याच्या निर्मितीचा इतिहास जाणून थक्क झाले आहेत.
दशकांपासून जलमग्न होते गाव
अनेक वर्षांनी सरोवराच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले असता त्यातील पाणी तात्पुरत्या स्वरुपात बाहेर काढण्यात आले, त्यानंतरच लोकांना दशकांनंतर जलमग्न गावाच्या खुणा आढळून आल्या. लेक रेसियाला जर्मनमध्ये रेसचेन्सी या नावाने ओळखले जाते. हे सरोवर दक्षिण टायरॉलच्या अल्पाइन क्षेत्रात असून ते ऑस्ट्रिया आणि स्वीत्झर्लंडच्या सीमेवर आहे.

दोन सरोवरांचे मिलन
1950 मध्ये पाण्यात बुडण्यापूर्वी क्यूरॉन नावाचे हे गाव शेकडो लोकांचे वसतीस्थान होते. एक जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी सरकारने येथे 71 वर्षांपूवीं एका धरणाची निर्मीत करविली, ज्यामुळे दोन सरोवरांना परस्परांशी जेडण्यात आले आणि क्यूरॉन गावाचे अस्तित्व संपले.
160 हून अधिक घरे पाण्याखाली
1950 मध्ये गावातील रहिवाशांच्या आक्षेपानंतरही अधिकाऱयांनी एक धरण निर्मिती आणि दोन सरोवरांना परस्परांशी जोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा हे गाव पाण्याच्या खोलीत हरवले. त्यामुळे 160 हून अधिक घरे जलमग्न झाली आणि क्यूरॉनची लोकसंख्या विस्थापित झाली. पण काही लोक परिसरात नवे गाव वसवून राहू लागले.
अनोखी अनुभूती
या क्षेत्राशी संबंधित लुइसा ऍझिलोनी यांनी ट्विटरवर काही छायाचित्रे शेअर केली आणि ‘या गावा’च्या अवशेषामधून चालणे एक ‘अनोखी अनुभूती’ होती असे म्हटले आहे. क्यूरॉनवरून प्रेरणा घेत एक पुस्तक लिहिण्यात आले आहे. तसेच नेटफ्लिक्सने एक सीरिजची तयार केली आहे.
हायकर्सच्या पसंतीचे ठिकाण

हे सरोवर उन्हाळय़ात हायकर्सच्या पसंतीचे ठिकाण आहे. तर हिवाळय़ात येथील पाणी गोठल्याने पर्यटक सरोवरावर चालून चर्चच्या शिखरापर्यंत पोहोचतात. दक्षिण टायरॉल पूर्वी ऑस्ट्रियाचा हिस्सा होता, पण पहिल्या महायुद्धादरम्यान यावर इटलीचा कब्जा झाला. या क्षेत्रात राहणाऱया लोकांची पहिली भाषा जर्मन आहे.