सभेत विविध विषयांवर चर्चा विद्यार्थ्यांचा गौरव : आज सत्यनारायण महापूजा
प्रतिनिधी /सांखळी
डिचोली तालुक्यातील सुर्ला विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा 59 वा वर्धापनदिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज मंगळवारी सकाळी 10 वा. दीपक सुर्लकर यांच्या यजमानपदाखाली संस्थेची वार्षिक सत्यनारायण पुजा होणार आहे.
सुर्ला कोठंबी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात आणि विविध विषयांवर चर्चा होऊन झाली. या संस्थेची निवडणूक जवळ आल्याने या वार्षिक बैठकीत इच्छुक उमेदवारांनी हजरी लावली होती. गोसेवा, सामाजिक उपक्रम, आर्थिक दुर्बलांना मदत, अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य गावातील लोकांना संस्था मोफत उपलब्ध करुन देत असल्याने जिल्हा पंचायतसदस्य गोपाळ सुर्लकर यांनी संस्थेचे अभिनंदन केले.
बैठकीच्या चेअरमन भानुदास सोननाईक यांनी सर्वांचे स्वागत केले आणि संस्थेची वाटचाल, भविष्यातील योजना, नागरिकांचे मिळणारे सहकार्य इत्यादी विषयांवर सविस्तर माहिती दिली. सचिव दीपक सुर्लकर यांनी संस्थेचा मागील अहवाल वाचला आणि नफा, तोटा या विषयी माहिती दिली.
यावेळी उपाध्यक्ष शांबा गावकर, शंकर घाडी, उदय नाटेकर, रोहिदास फोंडेकर, साजू घाडी, दत्ता सातार्डेकर, किशोर शिरोडकर, पत्रकार सुरेश बायेंकर यांची उपस्थिती होती. महेंद्र शिरोडकर, बाबलो नाटेकर, मनोहर वळवईकर, बाबलो फोंडेकर, प्रशांत साधले इत्यादींनी सभेत विविध विषयांवर चर्चा केली.
विद्यार्थी गौरव सोहळा
सुर्ला गावातील दहावी आणि बारावीत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या पल नाईक गांवकर, मथुशा फोंडेकर, शानवी आमोणकर, अमन कोल्हापुरकर, रुद्रेश फोंडेकर या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना संस्थेतर्फे स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देण्यात आले.
आज सत्यनारायण महापूजा
आज मंगळवार दि. 28 रोजी संस्थेच्या कार्यालयात सकाळी 10 वा. सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. तद्नंतर आरती, तीर्थप्रसाद होईल. सायंकाळी स्थानिकांतर्फे भजनाचा कार्यक्रम होईल, असे चेअरमन भानुदास सोननाईक यांनी कळविले आहे.