अक्कलकोट /तरुण भारत संवाद प्रतिनिधी :
अक्कलकोट तालुक्याचे भीष्म पितामह, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, दुधनीचे माजी नगराध्यक्ष सातलींगप्पा संगप्पा म्हेत्रें वय (९१)यांचे रात्री ८ वा.सुमारास वृद्धापकाळाने राहत्या घरी दुधनी येथे दुःखद निधन झाले.
दुधनीचे ते सलग ४0 वर्षे नगराध्यक्ष होते.त्यांनी आपल्या अथक परिश्रमाने दुधनी कृउबा राज्यात अव्वल आणले होते. उद्या शनिवार दि,0३ रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या पार्थिवार दुधनी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. तालुक्याचा एकनिष्ठ नेता हरवल्याची खंत माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे अन्य एक असे तीन मुले, तीन मुली, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Previous Articleकोविड सेंटरची जागा बदलण्याची मागणी
Next Article सैन्य भरती घोळयातील पोलीस अधिकाऱयांना बडतर्फ करा
Related Posts
Add A Comment