ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशातील सर्व शाळा 4 सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या अध्यक्षतेमध्ये कॅबिनेट बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
- 1 सप्टेंबरपासून सुरू होणार नियमित कॉलेज
जयराम ठाकूर म्हणाले, प्रदेशातील सर्व शाळा 4 सप्टेंबरपर्यंत बंद असणार आहेत. सध्या सरकारने 30 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास मनाई केली आहे. मात्र, शिक्षकांना शाळेत येवून ऑनलाईन शिक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत. तर 1 सप्टेंबरपासून नियमित कॉलेज सुरू होणार आहेत.
या सोबतच कॅबिनेट बैठकीत विविध श्रेणींच्या शिक्षकांची 4 हजार पदे अनुबंध आधारावर पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. या अंतर्गत उच्च शिक्षण 1360 पदे आणि 2640 पदे प्रारंभिक शिक्षण विभागात भरली जाणार आहेत. 810 जेबीटी, 820 कला शिक्षक, 870 पीईटी, 561 कॉलेज प्रवक्ता, 214 स्कूल प्रवक्ता, 250 जेओए, 16 कॉलेज आचार्य यांच्यासह तबला वादक आणि योगा शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.
पुढे ठाकूर म्हणाले, गृह विभाग क्षेत्र सिराजमध्ये अटल आदर्श विद्यालय सुरू केले जाणार आहे. तसेच प्रदेशात सध्या सुरू असलेले निर्बंध अजूनही कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.