शांतता समितीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक निंबाळकर यांचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
होळी आणि रंगोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी केले. सोमवारी सायंकाळी खडेबाजार पोलीस स्थानकात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी वरील आवाहन केले.
बेळगावच्या शांततेला धक्का पोहोचू नये याची प्रत्येकांनी काळजी घ्यावी. अनोळखीवर रंग ओतू नये. मानवी शरीराला घातक ठरतील अशा रंगांचा वापर करू नये. न्यायालयाच्या आदेशानुसार डॉल्बीचा वापर करू नये, आदीविषयी बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सौदागर, सतीश गौरगोंडा, दस्तगीर आळवाडकर, विजय जाधव, मोहन कारेकर, विजय अचमनी, जीया डांगी, मजर तहसीलदार आदींसह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. होळी, रंगोत्सवाच्या काळात अप्रिय घटना टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
गैरधंद्यांविषयी माहिती द्या
आपल्या परिसरात गैरधंदे आढळून आल्यास पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी बैठकीत केले.