3 मिनिटांत घेऊ शकतो 10 जणांचा बळी
पृथ्वीवर अनेक अत्यंत सुंदर प्राणी आढळून येतात. स्वतःच्या सुंदरतेमुळेच हे प्राणी लोकांना स्वतःकडे आकर्षित करत असतात. या प्राण्यांमध्ये स्वतःचे असे एक वैशिष्टय़ असते. या सुंदर दिसणाऱया प्राण्यांमध्ये अनेक अत्यंत विषारी असतात. विषारी प्राण्यांना प्रत्येक जण घाबरत असतो आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. बेडकाची एक प्रजाती अत्यंत विषारी असून तो तीन मिनिटात 10 जणांचा जीव घेण्याची क्षमता बाळगून आहे.

या बेडकाला केवळ स्पर्श केला तरीही विष फैलावू लागते. या विषारी बेडकाचे नाव गोल्डन पॉइजन फ्रॉग असून तो सुमारे दोन इंचाचा असतो. हा बेडुक अत्यंत विषारी असल्याने केवळ 3 मिनिटामंध्ये 10 प्रौढ व्यक्तींचा जीव घेऊ शकतो. कोलंबियात शिकारी या बेडकाच्या विषाचा वापर करून शस्त्रनिर्मिती करायचे. ग्लोव्ह्ज न घालता या बेडकांना पकडण्याचे धाडस केल्यास संबंधित व्यक्तीचा काही सेकंदांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता असते.
धोका जाणवल्यावर हा बेडुक स्वतःच्या त्वचेतून विष बाहेर काढू लागतो. याच्या विषाच्या प्रभावामुळे अनेक त्रास होऊ लागतात, यामुळे माणसाचा हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू होत असतो. हा बेडुक केवळ दोन इंचाचा असतो आणि याच्या दोन थेंब विषामुळे कुणाचाही मृत्यू होऊ शकतो. या बेडकाचा रंग पिवळा असतो. याचबरोबर फिकट हिरव्या रंगाचेही बेडुक आढळून येतात. हा बेडुक जितका चमकदार असतो तितकाच तो विषारी असतो असे एका संशोधनात आढळून आले आहे.