गेम ऑफ थ्रोन्समुळे जगभरात चाहते
लीना हेडी आणि मार्क मेनचाका यांच्या विवाहाची अनेक छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या रीयुनियनची चाहते प्रतीक्षा करत असावेत असे वाटत आहे. सेर्सी लॅनिस्टरची भूमिका साकारणाऱयाने हेडीने इटलीत एका खासगी सोहळय़ात विवाह केला आहे. तिचे गेम ऑफ थ्रोन्सचे सह-कलाकार पीटर डिंकलेज (टायरियन लॅनिस्टर), निकोलज कोस्टर-वाल्डौ (जेमी लॅनिस्टर), एमिलिया क्लार्क (डेनेरीस टागैरियन), कॉनलेथ हिल (लॉर्ड वॅरीज), मिशेल फेयरली (केटलिन स्टार्क) आणि सोफी टर्नर (सन्सा स्टार्क) ही स्वतःचा पती गायक जो जोनससोबत उपस्थित होती.

हेडीने स्वतःच्या ड्रीम वेडिंगसाठी पांढऱया रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मेनचाकाला ओजार्क ‘होमलँड’ आणि ‘शीज लॉस्ट कंट्रोल’मधील भूमिकेसाठी ओळखले जाते. 2013 मधील ‘दिस इज व्हेयर वुई लीव्ह’ या चित्रपटाचा तो दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता होता. हेडीने 2007 मध्ये संगीत दिग्दर्शक पीटर पॉल लफरान याच्यासोबत यापूर्वी विवाह केला होता. दोघेही 2013 मध्ये विभक्त झाले होते, या जोडप्याला एक मुलगा लस अून त्याचे नाव वायली लफरान आहे. हेडीने यानंतर 2018 मध्ये दिग्दर्शक डॅन कॅडनसोबत विवाह केला होता आणि या दोघांना एक मुलगी आहे. 2019 मध्ये हे दोघे विभक्त झाले होते. यानंतरच मेनचाक आणि हेडीने 2020 मध्ये डेटिंग सुरू केले होते.