क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
अनिल बेनके स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित सहाव्या अनिल बेनके चषक ऑल इंडिया निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
सरदार्स मैदानावरती आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंगला अंगडी, बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, संजय बेळगावकर, आमदार अनिल बेनके, लक्ष्मण पवार, संतोष पेडणेकर, सविता कांबळे, वीणा विजापूर, संदीप जालीहाळ, रेश्मा पाटील, श्र्रेयस नाकाडी, रेखा हुगोळ, लक्ष्मी राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेची पूजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. खासदार मंगला अंगडी यांनी दीपप्रज्वलन केले. मैदानाचे पूजन प्रभू यत्नट्टी यांनी केले. यष्टीचे पूजन मंगला अंगडी व रविंद्र गडादी यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते रंगीबेरंगी फुगे हवेत सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विजापूरचे दिवंगत सिद्धेश्वर स्वामीजी यांना श्र्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनिल बेनके स्पोर्ट्स फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. पहिल्या दिवशी प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सामन्यात आर्मी संघाने इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात महानगरपालिका संघाने बेळगाव पोलीस संघाचा तर तिसऱ्या सामन्यात साहेबप्रेमी संघाने एल अँड टी संघाचा पराभव केला.
आजचे सामने
- बीजेपी इलेव्हन वि. बिम्स स. 9 वा.
- अॅडव्होकेट वि. पत्रकार इलेव्हन दु. 12.30 वा.
- हेस्कॉम विऊद्ध बीआरडीएस दु. 1 वा.