बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार श्री आसिफ उर्फ राजू सेठ यांनी रविवारी सकाळी शिवबसवनगरमधील नागाfरकांना त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपल्या घरी आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी नागाfरकांनी मांडलेल्या अनेक समस्यांच निवारण करण्याचे आMवासन दिले.
यावेळी राजू सेठ म्हणाले, शिवबसवनगर येथील रहिवासी असल्याने या पाfरसरातील समस्या वेळेवर समजून घेता येतात. तसेच आम्ही शिवबसवनगरमधील रहिवासी बेळगावसह देशातील अनेक भागांचे प्रतिनिधीत्त्व करतो. बेळगावमध्ये शिकण्यासाठी आणि काम करण्यासाठी येणारे वैद्यकीय विद्यार्क्षी आणि डॉक्टर असल्याने जास्तीत जास्त लोक याच भागात राहतात. त्यामुळे या पाfरसरात रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा पुरवण्याची गरज असते आणि या कामात आपण आघाडीवर असल्याचे मत यावेळ त्यांनी व्यक्त केले.
यावेळी पाfरसरातील नागारिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिव्हिल हॉस्पिटल रोड येथील पक्ष कार्यालयात भेट
रविवारी संध्याकाळी, काँग्रेसचे उमेदवार श्री. आसिफ (राजू) सैत बेळगावी उत्तर मतदारसंघाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची सिव्हिल हॉस्पिटल रोड येथील पक्ष कार्यालयात भेट घेतली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे त्यांनी आभार आणि स्थानिक पातळीवर काम असेच काम करत राहण्याचा सल्ला दिला.
निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, आम्ही नेहमीच प्रामाणिकपणे काम केले आहे, आणि भविष्यातहि निवडणुकीच्या निकालाची पर्वा न करता तेच करत राहू. पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांसाठी ठरवून दिलेल्या उद्दिष्टांवरहि चर्चा करण्यात आली आणि या निवडणुकीत पक्ष आणि उमेदवाराला पाठिंबा देण्याची आणि काम करत राहण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
काळी आमराई परिसरात प्रचार फेरी
राजू सेठ यांनी रविवारी सकाळी काळी आमराई आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचार फेरी काढली. यावेळी त्यांच्यासमवेत समिउल्ला मडीवाळे होते. संविधान शिल्प युवक मंडळाच्या सदस्यांनी सेठ यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.

यावेळी राजू सेठ म्हणाले, डॉ. बी. आर. आंबेडकरांची युवकांना मूर्ती साकारताना पाहणे हे खूप सुंदर दृश्य आहे. आपल्या लोकशाही राष्ट्राने आपल्याला स्वतःचे हक्क मिळवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. एकत्र उभे राहण्यासाठी आणि एकजूट राहण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हि आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आणि मुलांचे शिक्षण हे आमचे मुख्य ध्येय असल्याचे ते म्हणाले.