पणजी : गोवा विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सोमवार दि. 27 मार्चपासून सुऊ होत असून ते 31 मार्चपर्यंत म्हणजे 4 दिवस चालणार आहे. गुऊवार दि. 30 मार्च रोजी रामनवमीची अधिवेशनाला सुट्टी आहे. बुधवार दि 29 मार्च रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थमंत्री या नात्याने 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विरोधी पक्ष आणि त्यांचे आमदार विविध विषय घेऊन सरकारला धारेवर धरणार असून जाब विचारणार आहे. अनेक सरकारी विधेयके या अधिवेशनात मांडण्यात येणार असून त्यांना मंजुरी देण्यात येणार आहे. राजधानी पणजीतील रखडलेली स्मार्ट सिटीची कामे, अटल सेतूची दुऊस्ती, म्हादईचे पाणी इत्यादी अनेक विषय विरोधी आमदार विधानसभेत उपस्थित करणार असून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत.
करवाढ न करण्याचा इरादा
यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्याचा सरकारचा इरादा नाही. सर्वांना खुश करणारा अर्थसंकल्प डॉ. सावंत यांनी तयार केला असून त्यावर शेवटचा हात फिरवण्याचे काम चालू आहे. काही नवीन घोषणा, तरतूदी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात येणार असून तो स्वयंपूर्ण गोवा करण्यावर भर देणारा असल्याचे सांगण्यात आले.
चार दिवस चालणार अधिवेशन
अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी एकुण 803 प्रश्न आले असून त्यात 207 तारांकीत तर 596 अतारांकीत आहेत. सर्व 4 दिवस सकाळी प्रश्नोत्तर तास, शून्य तास व दुपारी 2.30 वा नंतर विविध विषयांवर चर्चा होणार आहे. दररोज सकाळी 11.30 वाजता अधिवेशन चालू होणार असून प्रथम दिवशी निधन झालेल्यांना श्रद्धांजली तसेच अनेकांचे अभिनंदन ठराव चर्चेला येणार आहेत. पुरवणी मागण्यांवरही चर्चा होणार आहे.
सरकार आठ विधेयके मांडणार
आर्थिक सर्वेक्षण, मागील अर्थसकल्पावरील कृती अहवाल सभागृहात मांडण्यात येणार असून आताचा अर्थसंकल्प मांडल्यावर 4 महिन्यांचे लेखानुमान मान्य कऊन घेण्यात येणार आहेत. सरकारची 8 विधेयके विधानसभेत मांडण्यात येतील. शुक्रवारी 31 मार्च रोजी आमदारांना खासगी ठराव मांडता येतील. राज्यात विविध ठिकाणी जंगलात लागलेल्या आगी हा एक प्रमुख विषय अधिवेशनात विरोधी पक्षीय आमदार काढणार असून त्याच्या चौकशीची मागणी करणार आहेत. कॉग्रेस नेते राहुल गांधी यांची अपात्रता खासदारकी रद्द करण्याचा विषय काँग्रेसचे आमदार उपस्थित करणार असून इतर अनेक समस्यांवर लक्षवेधी सूचना मांडल्या जाणार आहेत.
वायफळ खर्च कमी करण्याऐवजी सरकार अधिवेशन काळ कमी करते : विरोधी पक्षनेते युरी आलेमाव याचा टोला

आज सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात भाजप सरकारने आत्मस्तुतीच्या कार्यक्रमांवर आणि जाहिरातींवर खर्च झालेल्या करोडो ऊपयांची आकडेवारी समोर येणार आहे. अपयशी भाजप सरकारचा खरा चेहरा समोर येईल. गोंधळलेले भाजप सरकार फालतू खर्च कमी करण्याऐवजी अधिवेशन कार्यकाळ कपात करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. सर्व विरोधी आमदार गोवा आणि गोमंतकीयांचे प्रŽ व समस्यांवर भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी सज्ज झाले आहेत. अंमली पदार्थांचा व्यापार, वेश्याव्यवसाय, डान्सबार, खंडणीखोर, पर्यटन क्षेत्रातील दलाल आणि इतर मुद्यांवर सरकारला उघडे पाडण्यासाठी भाजप सरकारचे काही मंत्री आणि काही सत्ताधारी आमदारांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे, असेही ते म्हणाले. आमच्या विधानसभेच्या प्रŽांच्या उत्तरांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात भाजप सरकारचे अपयश, आपत्ती व्यवस्थापन, म्हादईच्या मुद्यावर जाणीवपूर्वक केलेली डोळेझाक, जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढीवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश, दिवाळखोरीमुळे सरकारी खात्यांतील रिक्त पदे भरण्यात आलेले अपयश आणि कार्यक्रम आणि प्रसिद्धीवर केलेली अनेक कोटींची उढळपट्टी याचा तपशील यावेळी आम्ही उघड करणार आहोत असे युरी आलेमाओ यांनी दावा केला. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील बेकायदेशीर कारभार, प्रदूषण तसेच अतिक्रमण, कुंकळ्ळीसाठी आरोग्य सुविधांचे निर्माण, वाहतूक कोंडी, कुंकळ्ळी मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे संरेखन या मतदारसंघातील प्रमुख समस्या माझ्या प्राधान्यक्रमाच्या यादीत आहेत, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
अर्थसंकल्पातील घोषणा ‘सांताक्लॉजचे चॉकलेट’ : आमदार विजय सरदेसाई यांची टीका

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कितीही अर्थसंकल्पातून कितीही योजना जाहीर केल्या. घोषणा, सादरीकरणे केली आणि लोकांनीही त्यांच्याकडून कितीही इच्छा, अपेक्षा ठेवल्या तरी शेवटी प्रत्येकाच्या हाती केवळ ’सांताक्लॉजचे चॉकलेटच’ पडणार आहे, असा दावा आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हेते. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ प्रसिद्धीचा स्टंट असून मुख्यमंत्र्यांचा विधानसभेतील एकपात्री प्रयोग आहे. त्यात गोवा किंवा गोमंतकीयांना दीर्घकाळ लाभ देणारे कोणतेही धोरण तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे अर्थसंकल्प अर्थहीन आणि निरर्थक बाब बनत चालला असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पात एका खात्याला दिलेला निधी दुसऱ्या खात्यात वळवला जातो. महसुलाचे नवीन मार्ग शोधले जात नाहीत. गुंतवणूक नाही, व्यवसाय नाही. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ड्रग्ज आणि वेश्याव्यवसातून पर्यटनाचा महसूल गोळा करण्यात येतो, तरीही सरकार काम करत असल्याचे दाखविण्यासाठी उदार पैसे घेऊन कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, अशा अनेक गोष्टी सरदेसाई यांनी उघड केल्या. राज्यातील बहुतेक स्थानिक व्यवसाय, पारंपरिक उद्योग या सरकारने नष्ट केले असून जे काही शिल्लक आहेत ते ताब्यात घेण्यासाठी सरकारातील काही मंत्री आपल्या मित्रांना आमंत्रित करत आहेत. मुख्यमंत्र्यांची ज्ञानाची कमतरता, अक्षमता आणि आर्थिक बाबतीत उदासीनता राज्याला दिवाळखोरीच्या दिशेने नेत आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली. ध्रम्यान, आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोवा फॉरवर्ड सुमारे 72 प्रश्न, चार लक्ष्यवेधी सूचना, चार शुन्य तासांचा उल्लेख आणि एक खाजगी ठराव मांडणार आहे. त्यात प्रामुख्याने म्हादई, खाणकाम, पर्यटन धोरण, खंडणी, कौशल्य विकास, एसटी आरक्षण आणि एसटीसाठी केंद्रीय निधी वापरण्यात अपयश, जंगलांची आग, मोठ्या प्रमाणात जमिनीचे रूपांतरण, शिधापत्रिका रद्द करणे, यासारख्या मुद्यांचा समावेश असेल, अशी माहिती श्री. सरदेसाई यांनी दिली.