Back Pain : लॉकडाऊनच्या काळात घरून काम करण्याचे धोरण घेत अर्ध्याहून अधिक कंपन्यांनी घरून काम करण्यास सांगितले होते. मात्र, काही कंपन्यांनी कायमस्वरूपी घरातून काम करा असे धोरण निश्चित केले आहे. अशा परिस्थितीत घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची शारीरिक हालचाल कमी झाली. यासोबतच तासनतास बसून काम केल्यामुळे पाठदुखीची समस्या दिसून येतेयं. पाठदुखीने त्रस्त असलेले लोक डॉक्टरांच्या फेऱ्या मारतात, पण तुम्ही घरगुती उपायांनीही या पाठदुखीपासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय
–पाठदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय
स्ट्रेचिंग करा
तासनतास बसून लॅपटॉपवर काम करत असाल तर कंबरेला विश्रांती देण्यासाठी मधेच ब्रेक घ्या. जेणेकरून स्नायूंना आराम मिळेल. यासोबतच हलके स्ट्रेचिंग करा यामुळे स्नायूंचा कडकपणा दूर होतो आणि कमरेलाही आराम मिळतो.
कंबरेला मालिश करा
काम संपल्यानंतर रोज मोहरीचे तेल हलके गरम करून कंबरेला मसाज करा. तेलात लसूण टाकून ते गरम केल्यास जास्त फायदा होतो. यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि दुखण्यापासून आराम मिळतो. तसेच झोपही चांगली लागते.
हळदीचे दूध प्या
कोमट दुधात एक चमचा हळद मिसळून प्यायल्याने चांगली झोप लागते आणि पाठदुखीपासून आराम मिळतो. हळद बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे ज्यामुळे वेदना जळजळ आणि सर्दीपासून आराम मिळतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी हळदीचे दूध प्यायल्यानंतरच झोपावे.
आले देखील फायदेशीर आहे
पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठीही आल्याचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी आल्याचा छोटा तुकडा चघळा. वेदना कमी करणारे घटक आल्यामध्ये आढळतात. यासाठी आल्याचा चहा किंवा काढा बनवून देखील पिऊ शकता.
Previous Articleउत्तराखंड हिमस्खलनात 4 गिर्यारोहकांचा मृत्यू, 29 जण बेपत्ता
Related Posts
Add A Comment