स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati ) यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात नाशिक येथे साजरा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून साजरा करण्यात आला. येत्या काळात आपली स्वराज्य संघटना ही राजकारणात उतरणार असून संघटनेने मिशन 2024 निश्चित केले असल्याचे संभाजीराजे छत्रपतींनी सांगितले.
आपल्या वाढदिवसानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “स्वराज्य संघटना 2024 च्या निवडणुकीत राजकारणात उतरणार आहे. संघटनेचे 2024 हे निश्चित ध्येय असणार असून महाराष्ट्रातील मोठ्या पक्षांना संघटनेचा विरोध नसणार आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “2024 च्या निवडणुकीपुर्वी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असून स्वराज्य संघटनेने राजकारणात यावं, असं लोकांनाही वाटत आहे. कित्येक वर्ष आम्ही आंदोलन केली आहेत. आमच्याविरोधात गुन्हे दाखल झाले हे अजून कुठपर्यंत चालणार आहे? सामान्य माणसानेही राजकारणात यायला पाहीजे त्यांनाही ताकद मिळायला हवी. ,यासाठी स्वराज्य संघटना राजकारणात येणार आहे. त्यामुळेचत २०२४ साली स्वराज्य संघटना निवडणूक लढवणार,” अशी अशी घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
राज्यपाल कोश्यारी हे पायउतार झाले यावर भाष्य करताना ते म्हणाले, “राज्यपाल कोशारींना हे उशिरा सुचलेले शहाणपण असून नव्या राज्यपालांनी अगोदरच्या राज्यपालांनी ज्या काही चुका केल्या आहेत त्या लक्षात ठेवाव्यात. आगामी काळात महापुरूषांची बदनामी करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना ठोकून काढणार, असा इशाराच संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
Previous Articleफोन टॅपिंगमुळे वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना बढती
Next Article भाजपला पापाची फळं भोगावी लागतील
Related Posts
Add A Comment