Ajit Pawar : विधानसभेत आज लक्षवेधीला मंत्रीच गैरहजर असल्यानं विरोधी पक्षनेते अजित पवार हे चिडले.लक्षवेधीला सात मंत्री गायब असल्याने अजित पवार यांनी सरकारची खरडपट्टी काढली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी दिलगीरी व्यक्त केली. सरकारचा अतिशय गलिच्छ कारभार सुरु आहे. बेजाबदारपणा सुरु असल्याचे म्हणत अजित पवारांनी खडे बोल सुनावले. यांचा विधीमंडळाच्या कामात रस नाही बाकीच्याच कामात यांचा रस आहे. तुम्हाला जबाबदारीच भान नाही तरआम्हाला का बोलावलं? असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलगीरी व्यक्त करत म्हणाले की, काल रात्री एक वाजेपर्यंत सभागृह सुरु होते. ऑर्डर ऑफ द डे हा रात्री एक वाजता निघाला. त्यामुळे हो गोंधळ झाला. यापुढे सर्व मंत्र्यांना सूचना देण्यात येतील. अपवादात्मक परिस्थितीत परवानगी घेऊन मंत्री गैरहजेरी लावतील. अन्यथा गैरहजर राहू नये असे निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.त्याचबरोबर वेळेत ऑर्डर ऑफ द डे मिळेल या संदर्भातील खबरदारी घेतले जाईल असे अध्यक्षांनी सांगितले. आजचे कामकाज संपण्यापूर्वी संसदीय कामकाज मंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यासोबत चर्चा करून लक्षवेधींचा दिवस ठरवण्यात येतील असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.
Trending
- राज ॲग्रोच्या कोल्ड स्टोरेजला लागलेल्या आगीत कोट्यवधींचा बेदाणा, सोयाबीन जाळून खाक
- श्वानाला मिळाली मानद पदविका
- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात स्फोट, 6 ठार
- प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारा
- एलॉन मस्क पुन्हा बनले जगातील श्रीमंत व्यक्ती
- चार गॅरंटींची आज घोषणा?
- पर्यटकांमुळे अंटार्क्टिकात वितळतोय बर्फ
- आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोराला कंठस्नान