आझाद मैदानावरील शानदार सोहळ्यात आयुर्वेद संशोधक आचार्य बाळकृष्ण यांना ‘लोकमान्य मातृभूमी पुरस्कार’ प्रदान
पणजी : आम्हाला भारताला परम वैभवशाली बनवायचे आहे, अशी केवळ नारेबाजी आणि घोषणा देऊन चालणार नाही. त्यासाठी प्रथम स्वत: वैभवशाली बनले पाहिजे. त्यादृष्टीने वैभव उभे करावे लागेल. तेसुद्धा स्वत:साठी-स्वार्थासाठी नव्हे तर परमार्थ आणि भारतमातेसाठी करावे लागेल. हेच कार्य पतंजलीच्या माध्यमातून आचार्य श्रद्धेय बाळकृष्ण महाराज यांच्याकडून चालले आहे, असे प्रतिपादन योगगुरू स्वामी रामदेव महाराज यांनी केले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. तर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या ’लोकमान्य मातृभूमी पुरस्कार 2023’च्या वितरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर आचार्य बाळकृष्ण महाराज, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे संस्थापक, अध्यक्ष किरण ठाकुर आदींची उपस्थिती होती. अन्य मान्यवरांमध्ये पर्यटनमंत्री रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे, सौ. ब्राह्मीदेवी, कमलेश बांदेकर, सई ठाकुर-बिजलानी, प्रितम बिजलानी आदींची उपस्थिती होती.
पुरस्काराची रक्कम दिली गोव्यातील गो-सेवेसाठी
मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि 10 लाख रु. अशा स्वऊपातील पुरस्काराने आचार्य बाळकृष्ण यांना गौरविण्यात आले. हा पुरस्कारनिधी त्यांनी त्यात स्वत:चे पाच लाख ऊपये जोडून एकूण 15 लाख ऊपये गोव्यात गो-सेवेसाठी सुपूर्द केला. त्यावेळी बोलताना, गोव्यात गो-मातेच्या सेवेसाठीचे कार्य संपूर्ण देशाने घेण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. पुढे बोलताना स्वामी रामदेव महाराज यांनी, गोव्याची खरी ओळख योगभूमी हीच असून ती भगवान परशुरामाची भूमी आहे व तीच गो-मातेची, सनातन धर्माचीही भूमी आहे, असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते, त्याच तोडीचे कार्य तपोभूमीच्या माध्यमातून गोव्याच्या बहुजन समाजाची सनातन धर्मात निष्ठा वाढविण्याच्यादृष्टीने चालले असून त्याला तोड नाही, असे ते म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत…
जेव्हा आपण भारताच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू तेव्हापर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यात यशस्वी ठरू, असा संकल्प कऊया, असे प्रतिपादन रामदेवबाबा यांनी केले. देशाला एवढा स्वस्थ, समृद्ध, संस्कारक्षम, वैभवशाली बनवुया की सर्व देशांना मागे टाकून भारत हा जगातील मोठी आर्थिक, सामाजिक, राजकीय महासत्ता बनलेली असेल, असे ते पुढे म्हणाले.
आचार्यांचे कार्य भारतरत्न तोडीचे
आचार्य बाळकृष्ण यांच्याबाबत बोलताना स्वामी रामदेव यांनी त्यांच्या व्यक्तित्वाच्या प्रत्येक पैलुवर प्रकाश टाकला. क्रिकेटमधील चौकार-षटकारांसाठी सचिन तेंडुलकर आणि संगीतातील प्रतिभेसाठी लता मंगेशकर यासारख्या अनेकांना ’भारतरत्न’ पुरस्कार दिले आहेत. परंतु आचार्यांच्या एकेका कार्याची व्याप्ती पाहिल्यास त्यांचे प्रत्येक कार्य भारतरत्नच्या तोडीचे आहे, असे ते म्हणाले.
जगाला आदर्श ठरेल ’वैदिक टॅक्सोनॉमी’
आचार्य बाळकृष्ण यांचे कार्याची तुलना जगातील सर्व ऋषीमुनींच्या कार्याशीसुद्धा होऊ शकणार नाही एवढे महान आहे. सर्व ऋषीमुनींचे कार्य केवळ 700 जडीबुटींच्या शोधापर्यंतच मर्यादित राहिले. महापुऊष आचार्यांनी ते 7000 पर्यंत नेण्याचे महान कार्य केले आहे. संपूर्ण जगाला आदर्श ठरेल अशी ’वैदिक टॅक्सोनॉमी’ तयार करण्याचे काम केले आहे. प्रवृत्तीत राहून निवृत्तीत राहणे, सर्व पुऊषार्थ-परमार्थासाठी करणे, यासारखे असंख्य गुण त्यांच्याकडून आत्मसात केले पाहिजेत. पतंजली समुहात आज तेच सर्वेसर्वा असून त्यांनी हा व्यवसाय 40 हजार कोटीपर्यंत पोहोचवला आहे. भविष्यात 1 लाख कोटीपर्यंत नेण्याचे त्यांचे ध्येय असून यावरून त्यांच्या कार्याची व्याप्ती लक्षात येते.
जुळून आला योगायोग
आचार्य बाळकृष्ण यांनी प्रमोद सावंत यांना वैद्य म्हणून संबोधले, तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी स्वागत केले. पतंजली आयुर्वेद, आयुष मंत्रालय आणि लोकमान्य सोसायटी या तिघांचीही स्थापना 1995 मध्येच झाली हा आगळा योगायोगही त्यांनी निदर्शनास आणून दिला तेव्हाही टाळ्यांचा कडकडाट केला. श्रीपाद नाईक यांच्या कार्याचा गौरव करताना आचार्य बाळकृष्ण यांनी त्यांना ’थोरले बंधू’ म्हणून उल्लेख केला. देशाचे प्रथम आयुषमंत्री म्हणून त्यांच्या कार्याची इतिहासात नोंद राहील असेही ते म्हणाले.
पतंजलीच्या कार्याला तोड नाही : मुख्यमंत्री
देशात आयुर्वेदावर चाललेल्या संशोधनात पतंजलीच्या कार्याला तोड नाही. हरिद्वारच्या त्या देवभूमीत रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण महाराज यांच्यातर्फे चाललेले हे कार्य पाहता चरक, सुश्रूत आणि वाग्भट यांच्यानंतर बाळकृष्ण महाराज यांचे नाव घेतले जाईल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काढले. गोवा ही योगभूमी बनण्याच्या मार्गावर असून ’सन, सँड, सी’ यांना बरोबरीनेच स्पिरीच्युअॅलिटी आणि सॉफ्टवेअर ही नावेही जोडली जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. बाबा रामदेव यांच्या सहकार्याने गोव्यात वेलनेस टुरिझम वाढविण्याचेही प्रयत्न असून पर्यटकांना हेल्थ, वेलनेस आणि योग यांचाही लाभ घेता येणार आहे. त्यामुळे गोवा ही योगभूमी बनविण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न कऊया, असे डॉ. संवात यांनी सांगितले.
गोव्याचा लौकिक जगभरात पोहोचेल : ब्रह्मेशानंद स्वामी
य् ाा पुरस्काराच्या माध्यमातून आज मातृभूमीने हरिद्वारच्या देवभूमीचा थेट संबंध गोव्याच्या तपोभूमीशी जोडलेला आहे, असे प्रतिपादन स्वामी ब्रह्मेशानंद महाराज यांनी केले. हरिद्वारची देवभूमी आणि गोव्याची तपोभूमी यांचा समन्वय झालेला आहे. ही केवळ सुऊवात असून भविष्यात गोव्याच्या किनारी भागात विस्तारलेल्या ज्या थिल्लर पार्ट्या, अमली पदार्थांसारखे अन्य गैरव्यवहार चालतात त्यांना कायमचा चाप बसेल आणि योगाच्या माध्यमातून हा समुद्रनारायण गोव्याचा लौकिक जगभरात पोहोचवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
य् ााsगासाठी जीवन समर्पणाचे स्वामींचे कार्य अजोड : श्रीपाद नाईक
महाशिवरात्री, शिवजयंती आणि योगशिबिर तेही स्वत: योगगुरू रामदेव बाबा यांच्या पावन मार्गदर्शनाखाली गोव्यात होत आहे, हा खरोखरच दुग्धशर्करा योग आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. योग आणि शिव यांचा सुरेख संगम म्हणजे आदियोगी. त्या पार्श्वभूमीवर मांडवी किनारी संपन्न झालेल्या सोहळ्यास आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा या अभूतपूर्व सोहळ्यात सहभागी होण्याचे सौभाग्य तुम्हा-आम्हाला लाभले, ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे, असे नाईक म्हणाले. स्वामीजींनी ज्याप्रकारे योग आणि आयुर्वेदासाठी स्वत:चे जीवन समर्पित केले आहे त्याला तोड नाही, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलन आणि व्यासपीठावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुऊवात झाली. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. गोविंद भगत आणि रूपा धारवाडकर च्यारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
छत्रपतींचा एक तरी गुण आत्मसात करा : किरण ठाकुर

आपल्या स्वागतपर भाषणात किरण ठाकुर यांनी, शांतताप्रिय गोव्यात धर्माच्या नावाखाली भेदभाव होत नाही. अशी ही सुवर्णभूमी आरोग्यभूमी आणि योगभूमी व्हावी असा प्रयत्न पुढील काळात होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा एक गुण जरी आम्ही आत्मसात करू शकलो तरी आमचे जीवन सफल झाल्याचे समाधान लाभेल, असेही ते म्हणाले.