गुलालोत्सवासाठी जांबावली नगरी सजली
मडगाव : आज मंगळवार दि. 14 रोजी जांबावलीचा वार्षिक गुलालोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. श्री दामबाबाच्या भाविकांसाठी जांबावलीचा गुलालोत्सव एक पर्वणीच असते. आज मंगळवारी शिशिरोत्सवाचा महत्त्वाचा दिवस संध्याकाळी 3.30 वाजता श्री रामनाथ देव मंदिराच्या प्रांगणात श्री दामबाबाच्या पालखीवर गुलालाची उधळण करून गुलालोत्सव साजरा केला जाणार आहे. जांबावलीच्या श्री दामबाबाच्या शिशिरोत्सवाला बुधवारपासून सुऊवात झाली होती. गेले सहा दिवस विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आले होते. श्री दामबाबाच्या शिशिरोत्सवात अनेक मठग्रामस्थांचा मुक्काम सध्या जांबावलीत आहे. गुलालोत्सवात भाविकांनी केवळ लाल रंगाचा गुलाल वापरावा, असे आवाहन मठग्रामस्थ हिंदु सभेच्यावतीने करण्यात आले आहे. आज दुपारपासूनच भाविक जांबावलीकडे ढोल-ताशांचा गजर करीत प्रयाण करणार आहेत. यंदा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने केपे पोलिसांनी वाहतूक आणि शिस्त राखण्यासाठी सर्व उपाययोजना आखल्या आहेत. आज पहाटे श्री दामोदराची पालखी रामनाथ मंदिराच्या प्रांगणात आणून ठेवली जाईल आणि दुपारी गुलालोत्सवानंतर परत आपल्या मंदिरात नेली जाणार आहे. दामोदर देवावर गुलाल उधळल्याशिवाय भक्तांनी गुलालोत्सवाला सुऊवात कऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. गुलालोत्सवानंतर रात्री 11 वा. ‘नवरदेवाची वरात’ निघणार आहे. त्यानंतर रात्री 12 वा. सदाबहार संगीताचा कार्यक्रम ‘संगीत सभा’ होईल. बुधवार दि. 30 रोजी सकाळी 10 वा. होणाऱ्या ‘धुळपेट’ने जांबावलीच्या शिशिरोत्सवाची सांगता होईल.