Kolhapur Heavy Rainfall: गेल्य़ा दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात, धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. आज सकाळी साडे नऊ वाजता ७५० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. नदी काठच्या गावांनी व ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये सकाळी ९:३० वाजल्या पासून ५५० क्युसेक वरुन ७५० क्युसेक इतकी वाढ केली आहॆ .
रात्रभर पडलेल्या संततधार पावसामुळे हातकणंगले तालुक्यातील अनेक ओढ्यांना पाणी आले आहे. पट्टणकोडोली गावालगत असलेल्या धाकट्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे हुपरी कोल्हापूर हा मार्ग बंद झाला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून या मार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली आहे. दरम्यान कोल्हापूरहून हुपरीकडे येणाऱ्या नागरिकांना पर्यायी गोकुळ शिरगाव मार्गाने हुपरी,प.कोडोली कडे यावे लागणार आहे.
काल रात्रीपासून या परिसरात सुरू असलेला संततधार आज सकाळपासून ही कायम आहे. त्यामुळे अनेक रस्त्यावर पाणी आले आहे. हुपरी कोल्हापूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते पट्टणकोडोली ओढ्यावर पाणी आल्यामुळे ही वाहतूक ठप्प झाली आहे.
Previous Articleखानापुरात विनापरवाना बांधकामांचा सुकाळ
Next Article जिल्हय़ात उभारणार 75 चार्जिंग स्टेशन्स
Related Posts
Add A Comment