शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झालं की ओठ कोरडे पडायला लागतं. तसेच लिपस्टिकचा अति वापर झाला की ओठ काळे पडायला सुरुवात होते. याशिवाय चेहऱ्यावरची क्रिम ओठांना लागल्या जातात. त्यानंतर ओठ काळे पडायला लागतात. हळूहळू करत ओठ खूपच काळे पडतात. याशिवाय धुम्रपान करणे, सतत काॅफी पिणे, दिवसभर लिपस्टिक लावल्यानंतर संध्याकाळी ती निट न काढणे. लिपस्टिक एक्सपायरी डेटनंतरही वापरणे, एसपीएफ असलेले लिपबाम न वापरता उन्हात जाणे याने देखील ओठ काळे पडतात. यासाठी वेळच्यावेळी ओठांची काळजी घ्य़ा. जशी आपण चेहऱ्यांची काळजी घेतो तशी ओठांची काळजी देखील घेणे गरजेचे आहे. आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. तसेच घरच्या घरी लिपबाम कसे बनवायचे याबद्दल टिप्स देणार आहोत.
जसं आपण चेहऱ्याला माॅश्चरायझर, स्क्रबर करतो तसेच ओठांना देखील करणे गरजेचे आहे. यासाठी कशाचा वापर करायचा जाणून घेऊया.
ओठांना असं माॅश्चरायझर करा
ओठांना माॅश्चरायझर करण्यासाठी सुरुवातीला गुलाब पाण्याचा वापर करा. कापसावर गुलाबपाणी घ्या आणि ओठांवरून अलगद फिरवून घ्या. तसेच चांगल्या क्लिझंरचा वापर करा. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या कुसकरून ओठांना लावा. किंवा ऑलिव्ह ऑईल, बदामाच्या तेलाचा वापर करा. तुपात हळद मिक्स करून देखील समाज करू शकता.
ओठांना स्क्रबिंग करा
ओठांना स्क्रबिंग करण्यासाठी साखर आणि मधाचा वापर करा. साखर मिक्समधून काढून घ्या. फार बारीक करू नका. त्यात मध घाला आणि ओठांना हलक्या हातांनी मसाज करा.
घरच्या घरी असा लिपबाम बनवासाहित्य
बिटाचा रस- २ चमचे
व्हॅसलिन- १ चमचा
मध- पाव चमचा
पॅराशूट तेल – १ चमचा
कृती
सगळ मिश्रण एकत्र करा. यानंतर ते खूप वेळ फेटा. कारण मिश्रण लवकर एकजीव होत नाही. क्रिमबेस मिश्रण झाल्यानंतर फ्रिजरला ठेवून द्या. तुमचं लिपबाम तयार. रोज रात्री तुम्ही लावून माॅश्चराइशर करा. सतत महिनाभर याचा वापर केल्यास तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
Related Posts
Add A Comment