बेळगाव : तालुक्यातील काही ग्राम पंचायती रोजगार हमी योजनेंतर्गत काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे कामगार बेरोजगार झाले आहेत. ऑनलाईनद्वारे हजेरी भरताना समस्या निर्माण होत आहे. हे कारण पुढे करण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे कामगारांवर अन्याय होत असून तातडीने सर्व ग्राम पंचायतींना रोजगार हमी योजनेंतर्गत कामगारांना काम उपलब्ध करावे, अशी मागणी मजदूर नवनिर्माण संघाच्यावतीने जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंतच काम दिले जाते. त्यानंतर आलेला निधी केंद्र सरकारकडे परत जातो. तेव्हा त्याचा सारासार विचार करावा आणि काम उपलब्ध करून द्यावे. आधार लिंक होत नाही. त्यामुळे काम देणे कठीण आहे, असे सांगितले जात आहे. आता केवळ एकच महिना उरला असून किमान हे उर्वरित दिवस तरी सर्व ग्राम पंचायतींनी काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे. जिल्हा पंचायतीचे नियोजन संचालक अधिकारी रवि बंगेरप्पान्नवर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवाजी कागणीकर, राहुल पाटील, बसवंत कोल्हे, कविता मुरकट्टी, अडव्याप्पा कुंबरगी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleमलप्रभा स्नानासाठी भाविकांची गर्दी
Next Article आम्हाला विश्वासात घ्या!
Related Posts
Add A Comment