बेळगुंदीत आरोग्य तपासणी शिबिर

वार्ताहर /किणये
तालुक्यात मंगळवारी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. अनेक गावांमध्ये प्राथमिक शाळांच्यावतीने जनजागृती फेरी काढण्यात आली. तसेच विविध संघ-संस्थांच्यावतीने व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
नावगे येथील प्राथमिक मराठी शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली. महात्मा जोतिबा फुले यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन परशराम शहापूरकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरिता हुंदरे व गीता सुतार यांनी केले. यावेळी रामलिंग चिगरे, बसवराज गुरव, अरुण गुरव, कृष्णा बेळगावकर, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते. एसडीएमसी अध्यक्ष चांगाप्पा यळ्ळूरकर यांचे भाषण झाले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विजया ऑर्थो आणि ट्रामा सेंटर यांच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी समाजसेवक वीरेश हिरेमठ यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यसंदर्भात माहिती दिली. डॉ. गौरव पाटील, डॉ. शुभम मोरे, डॉ. शिवानी मोरे, डॉ. मनस्वी कडोलकर, डॉ. माहिर राऊत आदींनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करून मोफत औषधे दिली. मुख्याध्यापक के. डी. पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा शहापूरकर आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.