मुंबई
टाटाच्या बहुचर्चित टियागो ईव्ही कारला बुकिंगच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांकडून उत्स्?फूर्त प्रतिसाद लाभला. शुभारंभाच्या एका दिवसात 10 हजार कार्सचे बुकिंग झाल्याचे कंपनीने जाहीर केले असून या उत्साहामुळे ग्राहकांना अधिकचा लाभ देण्याचीही घोषणा केली आहे. यापुढील दहा हजार ग्राहकांसाठीही सुरुवातीची शोरुम किंमत 8.49 लाख रुपये असेल असे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा यांनी जाहीर केले. 21 हजार रुपये भरून या गाडीचे बुकिंग करता येऊ शकते. गाडी याच महिन्यात प्रमुख शहरांमधील आघाडीच्या मॉल्समध्³ाs प्रदर्शनार्थ ठेवण्³ाात येईल.