वाहन चालविणे नाही सोपे
रोड ट्रिपची आवड असणारे लोक बहुतांशकरून कार चालविणे आव्हानात्मक असलेल्या रस्त्याची निवड करत असतात. परंतु सध्या एका अशा रस्त्याचे छायाचित्र व्हायरल होत आहे, जो एकदा पाहिल्यावर रस्ता नव्हे तर एखादा साप किंवा अजगराप्रमाणे भासतो, परंतु प्रत्यक्षात हा एक रस्ता आहे.
या रस्त्याला काही जण जगातील सर्वात धोकादायक रस्ता देखील ठरवत आहेत. या रस्त्यावर कार चालविणे सोपे नसल्याचे बोलले जाते. हा रस्ता पर्वतीय भागात असल्याने तो अधिकच धोकादायक वाटू लागतो.

प्रत्यक्षात हा रस्ता अर्जेंटीना आणि चिली या देशांना जोडणारा आहे. हा रस्ता तेथील प्रसिद्ध महामार्गाचा एक हिस्सा आहे. या रस्त्याचा व्हिडिओ ट्विटरवर मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. या महामार्गाला लास काराकोल्स पासच्या नावाने ओळखले जाते.
पर्वतांदरम्यान या रस्ता अत्यंत वळणदार पद्धतीने तयार करण्यात आल्याने या महामार्गाला हेयर पिन बँड्स हायवे देखील म्हटले जाते. 10 हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर तयार करण्यात आलेला हा मार्ग हिमवृष्टीमुळे सुमारे 6 महिन्यांपर्यंत बंद असतो. अत्यंत अधिक वळणे असूनही या रस्त्यांवरून मोठय़ा प्रमाणावर वाहतूक सुरू असते.