ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (The National Security Advisor of India ajit doval) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे त्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा भेट असल्याचं बोललं जातंय.
अजित डोवाल यांनी आज सकाळीच राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येतेय. या फेटीदरम्यानचे फोटोही समोर आलेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अजित डोवाल यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर या भेटीदरम्यान चर्चा झाली. मात्र चर्चेत नेमकं काय घडलं, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यानंतर अजित डोवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर अजित डोवाल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा या निवासस्थानी गेले. तेथे त्यांनी वर्षा बंगल्यावरील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अजित डोवाल आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या ४५ मिनटे चर्चा झाली. मात्र नेमकी चर्चा काय झाले हे मात्र समजू शकलेलं नाही. दरम्यान, ते आज विविध नेत्यांना भेटी देणार आहेत. अजित डोवालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करा; मुख्यमंत्री शिंदेंची राज्यपालांकडे मागणी