स्वस्त शस्त्रक्रियेकरता भारतात येत आहेत लोक
अमेरिकेत आता चेहरे विशेषकरून गालांवरील चरबी हटवून सुंदर दिसण्यासाठी सर्वसामान्य लोक देखील सेलिब्रिटीप्रमाणे प्लास्टिक सर्जरी करवून घेत आहेत. सोशल मीडियावर सुंदर दिसण्याची इच्छा लोकांना अशाप्रकारचे पाऊल उचलण्यास भाग पाडत आहे.
काही हॉलिवूड अभिनेत्रींच्या चेहऱयांना सुंदर स्वरुप देणारे न्यूयॉर्कचे प्लास्टिक सर्जन डॉ. ऍन्ड्रय़ू जाकोनो यांनी चेहऱयावरील काही हिस्से त्याच्या आकाराचे स्वरुप ठरवत असतात असे सांगितले. गाल आणि जबडय़ामधील हिस्स्याच्या चरबीद्वारे चेहऱयाचा आकार ठरत असतो.

चेहऱयाचा आकार शरीराच्या वजनातील उतारचढावाने प्रभावित होत नाही. हा आकार जन्माच्या काळापासून एकाच प्रकारचा असतो. कुणाकुणाचा चेहरा देवदूतासारखा असतो, गालांची चरबी हटविण्यासाठी शस्त्रक्रिया सर्वात उपयुक्त पर्याय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
ही शस्त्रक्रिया काही नवी नाही, परंतु याचा वापर अलिकडच्या काळात वाढला आहे. आता 5 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 3 पट अधिक शस्त्रक्रिया करत असल्याचे जाकोनो यांनी सांगितले आहे. ही एक गोपनीय प्रकारची प्लास्टिक सर्जरी आहे. यात चेहऱयावरील एक ते दोन मिलिमीटरचा किंचित बदल व्यक्तिच्या चेहऱयात मोठा बदल घडवून आणतो. परंतु या शस्त्रक्रियेमुळे चेहऱयाचा एक हिस्सा लकवाग्रस्त होऊ शकतो अशी भीती सर्जन डॉ. लारा देवगण यांनी व्यक्त केली आहे.
भारतात 50 टक्के स्वस्त शस्त्रक्रिया
भारतात प्लास्टिक सर्जरी करवून घेण्यासाठी अमेरिका, आफ्रिका आणि आखाती देशांमधून लोक येत आहेत. अमेरिका, युरोप आणि मध्यपूर्वेच्या तुलनेत भारतात या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च 50 टक्क्यांनी कमी आहे. भारत आता जगासाठी कमी खर्चाचा प्लास्टिक सर्जरी हब ठरत चालला आहे.