केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शनिवारी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसच्या (Indo- Tibet Border Police) जवानांचे कौतुक करून सीमेवर असताना कोणीही भारतावर एक इंचही अतिक्रमण करू शकत नाही. असे म्हटले आहे. कर्नाटकच्या बेंगळूरमध्ये ITBP च्या निवासी आणि प्रशासकीय संकुलांचे उद्घाटन करताना, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शहा म्हणाले की, ITBP सर्व CAPF मध्ये सर्वात कठीण क्षेत्रात कार्यरत आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, उणे ४२ अंश तापमानात देशाच्या सीमांचे रक्षण करताना त्यांच्या मनोबलाची आणि महान देशभक्तीची आपण कल्पनाही करू शकत नाही, असे शाह म्हणाले. “आमचे ITBP सैनिक गस्त घालत असतात किंवा सीमारेषेवर तळावर असल्यामुळे भारत- चीन सीमेबद्दल काहीही काळजी करण्याची गरज नाही. ITBP सैनिकाच्या उपस्थितीमुळे कोणीही आमच्या जमिनीवर एक इंचही अतिक्रमण करू शकत नाही. ITBP ने आपल्या स्थापनेपासून कठीण भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थितीत कमालीची कामगिरी केली आहे.”असेही ते म्हणाले
Related Posts
Add A Comment