रोहिन लेंगडेचा प्रकल्प ठरला सर्वोत्कृष्ट
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावचा सुपुत्र रोहिन लेंगडे हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात नासाच्या सहकार्याने रॉकेट संशोधन अभ्यासामध्ये गुंतला आहे. विद्यापीठाच्या काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘हायप्रेशर लिक्विड प्रपल्शन’ या विषयावर एक प्रकल्प विद्यापीठाला सादर केला.

हा प्रकल्प उत्कृष्ट झाल्याने विद्यापीठाने यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या देशाचे राष्ट्रध्वज लावून त्यांचा सन्मान केला. या प्रकल्पामध्ये रोहिन सहभागी झाल्याने भारताचा तिरंगासुद्धा लावण्यात आला. उद्योजक प्रेमचंद लेंगडे यांचा रोहिन हा नातू आहे.