बेळगाव : पिरनवाडी येथील जंगली पिर अर्थात हजरत शहा सद्रोद्दीन अन्सारी उर्फ जंगली पिर बाबा यांचा उरूस 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे. दि. 22 रोजी रात्री 11 वा. संदल मिरवणूक निघेल, 23 रोजी पहाटे 5 वा. संदल चढेल आणि त्यानंतर भर उरूस नैवेद्य प्रसादाचे वितरण होईल. रात्री 8.30 वा. मुजतबानाझा वि. गीता किस्ती यांच्यात कव्वाली मुकाबला होणार आहे. शुक्रवार दि. 24 रोजी रात्री 8.30 वा. मदरसा मधील विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमानंतर दिलशाद, इर्शाद साबरी वि. चांद कादरी यांच्यात कव्वाली मुकाबला होणार आहे. शनिवार दि. 25 रोजी रात्री 9 वा. निजामुल्ला खान महालिंगपूर यांचा विनोदी कार्यक्रम होईल. रविवार दि. 26 रोजी सायंकाळी 4 वा. नामवंत मल्लांचा कुस्ती आखाडा आयोजित केला आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन गैबुसाब करिमसाब मुजावर व मुन्ना नबीवाले यांनी कळविले आहे.
Previous Articleखेडचा ‘आराध्य’ ठरला सर्वात लहान बालवैज्ञानिक
Next Article व्हॅलेंटाईन डे वर प्रतिबंध घालण्याची मागणी
Related Posts
Add A Comment