
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित अर्जुन चषक 12 वर्षाखालील मुलांच्या डे नाईट क्रिकेट स्पर्धेत युनियन जिमखाना संघाने हुबळी संघाचा 10 गडय़ांनी तर दाभोळ क्लब संघाने अर्जुन स्पोर्ट्स संघाचा 10 गडय़ाने पराभव केला. अनिष तेंडुलकर, दीगंत मनोहर सामनावीर ठरले.
लव डेल सेंट्रल स्कूलच्या टर्फ मैदानावर उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे अमर सरदेसाई यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून करण्यात आले. अजय चव्हाण, देवेंद्र उपाध्ये, मोहम्मद ताहीर सराफ, डॉ. सचिन पाटील, समीर किल्लेदार, विशाल चौगुले, मिलिंद चव्हाण, सचिन साळुंखे, परशराम पाटील आदी उपस्थित होते.
पहिल्या सामन्यात यजमान युनियन जिमखाना संघाने हुबळीच्या चॅम्पियन्स नेट संघाचा दहा गडी राखून पराभव केला. चॅम्पियन्स नेट संघाने 25 षटकात 7 बाद 61 धावा केल्या. अखिलेश जमानी व कार्तिक शेठ यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. जिमखानातर्फे अनिश तेंडुलकरने 3 तर अद्वेत पाटील व मोहम्मद हमजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला उत्तरादाखल युनियन जिमखाना संघाने 6.1 षटकात बिनबाद विजयाचे उद्दिष्ट गाठले. जीतीन दुर्गाई याने 7 चौकारांसह 34 तर अर्जुन येळ्ळूरकर याने 14 धावा केल्या.
दुसऱया सामन्यात दाभोली संघाने अर्जुन स्पोर्ट्स संघाचा 10 गडय़ांनी पराभव केला अर्जुन स्पोर्ट्स संघाने 13.1 षटकात सर्वबाद 64 धावा केल्या. शाहरुख धारवाडकरने सर्वाधिक 19 धावा केल्या दाभोली क्रिकेट क्लब तर्फे दिगंत मनोहर याने पाच, कवीश परब, शौर्या चोडणकर, आयुष व आईढ थोटा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल दाभोली संघाने 5.1 षटकात बिनबाद 64 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. ऋत्विक लाड 28 आदिप मिस्कीन याने 24 धावा केल्या