लोकप्रिय मॅसेजिंग अॅप असलेल्या व्हाट्सअॅपने अल्पावधीतच लोकप्रीयता मिळवली आहे. दरवेळी आपल्या युजर्सना नवीन गोष्टींचा अनुभव देत असल्याने व्हाटस्अपच्या नवीन बदलाची उत्सुकता प्रत्येक य़ुजरला असते.
व्हॉट्सअॅप आपल्य़ा युजर्सना आपल्या विविध ग्रुप्सना एका मोठ्या संरचनेत आणण्यासाठी कम्युनिटी नावाचे नवे फिचर आणत आहे. तसेच आपली मेटा प्लॅटफॉर्मची मेसेजिंग सेवा, मोठ्या ग्रुपसाठी व्हिडिओ कॉलिंग सेवा आणि इन-चॅट पोल यासारख्या इतर वैशिष्ट्यांसह बदल होणार आहे. या संदर्भातील माहीती मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एका पोस्ट द्वारे दिली.
जाणुन घेऊया व्हॉट्सअॅपमध्ये काय नवीन गोष्टी आपल्य़ाला दिसणार आहेत.
व्हाटस्अप कम्युनिटी फिचर
कम्युनिटी या नव्या फिचरमध्ये विविध चॅटिंग ग्रुपना एका मोठ्या छत्राखाली एकत्र आणण्याचा प्रय़त्न केला जाईल. यामध्ये ग्रुपचा अॅडमिन हजारो लोकांना आपल्या सूचना पाठवू शकतो. हे फिचर मुख्यता विविध प्रकारचे वर्कशॉप किंवा शाळा यामध्ये वापरले जाऊ शकते. नवीन बदलानंतर वॉट्सअॅप आता चॅट ग्रुप्सना सध्या असलेल्या 256 ग्रुप सदस्य़ांची संख्या वाढवून ती1,024 पर्यंत वाढवण्याची मुभा असेल. असा प्रकारची परवानगी टेलिग्राम किंवा इतर मॅसेजिंग अॅप देत असते.
व्हीडियो कॉलिंग
आपल्या पुर्वीच्या व्हिडियो कॉलिंगच्या सेवेची मर्यादा वाढवली आहे. पुर्वी अनेक लोकांना एकत्र व्हिडियो कॉलिंगचा आनंद घेण्य़ासाठी निंक तयार करावी लागत असे. पण आता हि क्षमता वाढवून 32 लोक एका व्हिडिओ कॉलिंगवर सहभागी होऊ शकतात.
इनचॅट पोल
व्हाट्सअॅपने चॅटपोल या नव्या फिचरची चाचणी घेण्यास यापुर्वीच सुरवात केली होती. वॉट्सअॅपरचे हे एक अनोख वैशिष्टय असून याद्वारे ग्रुपवर एखाद्या विषयावर मतदान घेण्याची तयार करू शकते.या मध्ये वापरकर्त्यांना पोलमध्ये 12 पर्याय उपलब्ध असतील.