|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » भाजपाध्यक्ष अमित शहा आज लातूर दौऱ्यावर

भाजपाध्यक्ष अमित शहा आज लातूर दौऱ्यावर 

ऑनलाईन टीम / लातूर :

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने आज भारतीय जनता पक्षाचे लातुरात ‘बूथ विजय अभियान’ पार पडत आहे. यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांच्यासह भरपुर मंत्र्याची उपस्थिती असणार आहे. त्याअनुषंगाने मागील आठ दिवसांपासून या अभियानाची जय्यत तयारी केली जात असून सध्या संपूर्ण शहर भाजपमय करण्यात आले आहे.

लातूर, नांदेड, हिंगोली आणि उस्मानाबाद या जिह्यातील बूथप्रमुखांची स्वतंत्र बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा घेणार आहेत. दिवसभर चारही जिह्यातील पदाधिकाऱयांच्या मॅरेथॉन बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. सायंकाळी अमित शहा एका सभागृहात व्यापारी, उद्योजक यांच्यासह प्रति÷ित नारिकांशी संवाद साधणार आहेत. जिह्यातील लोकसभा मतदार संघ आणि सहा विधानसभा मतदार संघाच्या अनुषंगाने हे अभियान होणार आहे. भाजपने कॉग्रेसच्या बालेकिल्ल्यात सर्व ठिकाणी आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा निश्चय केला आहे. त्यानुसार तयारी सुरू आहे. मागील चार वर्षात शासनाने राबवलेल्या योजना, प्रत्यक्षात किती जणांना याचा लाभ मिळाला, तसेच सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन आगामी काळात मार्गक्रमण कसे करायचे याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

Related posts: