वृत्तसंस्था/ लंडन
बॅटल ऑफ ब्रिटस् प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेतील तिसऱया स्थानासाठीच्या प्ले ऑफ सामन्यातून ब्रिटनचा माजी टॉप सीडेड टेनिसपटू अँडी मरेने माघार घेतली आहे. अँडी मरे आणि ब्रिटनचा कॅमेरून नुरी यांच्यात हा सामना लॉन टेनिस संघटनेतर्फे आयोजित होता.
दुखापतीमुळे बऱयाच कालावधीत मरेला टेनिसपासून अलिप्त राहावे लागले होते. तब्बल सात महिन्यानंतर 33 वर्षीय अँडी मरेने गेल्या आठवडय़ात जेमी मरेने आयोजित केलेल्या मदतनिधी टेनिस स्पर्धेत आपले पुनरागमन केले होते. गेल्या पाच दिवसांच्या कालावधीत मरेने चार सामने खेळताना ब्रॉडी आणि वॉर्ड यांचा पराभव करत उपांत्य फेरीत मजल मारली होती. शनिवारी उपांत्य सामन्यात इव्हान्सने मरेचा पराभव केला होता. त्यामुळे तिसऱया स्थानासाठीचा प्ले ऑफचा सामना कॅमेरून नुरी बरोबर आयोजित केला होता.