वृत्तसंस्था/ कैरो
भारताचा 26 वर्षीय टेनिसपटू अर्जुन कढेने इजिप्तमधील झालेल्या 15000 डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या आयटीएफ पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. 2020 च्या टेनिस हंगामात कढेचे हे दुहेरीतील दुसरे विजेतेपद आहे.
या स्पर्धेतील पुरूष दुहेरीच्या अंतिम सामन्यात अर्जुन कढे आणि त्याचा युक्रेनचा साथीदार मेनाफोव्ह यांनी युक्रेनचा ओर्लोव्ह आणि इटलीचा विलार्दो यांचा 6-1, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद मिळविले. दोन आठवडय़ापूर्वी याच ठिकाणी अर्जुन कढेने दुहेरीतील विजेतेपद मिळविले होते.