ओटवणे /प्रतिनिधी-
असनिये येथील श्री वारकरी विठ्ठल मंडळाच्यावतीने कोरोना संकट काळात गेले दिड वर्ष उत्कृष्ट काम केलेल्या गावातील सर्व कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी श्री वारकरी विठ्ठल मंडळाचे अध्यक्ष आप्पा सावंत, रत्नाकर सावंत, आनंद सावंत, जनार्दन सावंत दशरथ सावंत, लक्ष्मण सावंत, बबी सावंत, आत्माराम सावंत, संजय सावंत, असनिये हायस्कूलचे मुख्याध्यापक केलाश जाधव, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भारती देसाई, विलास सावंत, नामदेव असनकर, नयन सावंत, भरत सावंत, सुधाकर घोगळे, नामदेव सावंत, कृष्णा सावंत, मोहन सावंत, दुलाजी सावंत, चंद्रकांत भिसे, श्री खरात, भास्कर राठोड, श्री अत्राम रूपाली सावंत, श्वेता सावंत, सोनाली सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी असनिये सरपंच स्नेहल असनकर, असनिये प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका वासंती पालव, ग्रामसेवक मुकुंद परब, पोलीस पाटील विनायक कोळापटे, आरोग्य सेवक श्री पारधी, आशा स्वयं सेविका उर्मिला सावंत आदी गावातील सर्व कोरोना योद्ध्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व कोरोना योद्ध्यांच्या कार्याचा गौरव केला.