ऑनलाईन टीम/तरुण भारत
एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी विकण्यासाठी मोदी सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. मंगळवारी केंद्र सरकारने सरकारी मालकीच्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या विक्रीला मंजूरी दिलीय. ही कंपनी आता नंदल फायनान्स अॅण्ड लिजींग या कंपनीला २१० कोटींना विकण्यात येणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षामधील ही दुसरी सरकारी कंपनी आहे जिच्या विक्रीला केंद्राने ग्रीन सिग्नल दिलाय. काही आठवड्यांपूर्वीच सरकारने टाटा समुहासोबत एअर इंडियाच्या विक्रीचा करार केला होता. याच आर्थिक वर्षामध्ये सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा व्यवहार पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.