राजस्थानातील बाडमेर येथे हेर अटकेत : पाकिस्तानचा क्वॉडकॉप्टर सैन्याकडून नष्ट
वृत्तसंस्था/ बाडमेर
राजस्थानच्या बाडमेरमध्ये शनिवारी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा एका हस्तकाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या आयएसआय हस्तकाला चौकशीसाठी जयपूर येथे आणले गेले आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या दिशेकडून घुसखोरी करत भारतीय सीमेत दाखल झालेल्या एका क्वॉडकॉप्टरला भारतीय सैन्याने पाडविले आहे. केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेनजीक सकाळी 8 वाजता हा क्वॉडकॉप्टर उड्डाण करताना दिसून आला होता.
एलओसीवर पाडविण्यात आलेला ड्रोन डीजेआय या चिनी कंपनीने तयार केलेला आहे. काही काळापासून भारताला लागून असलेल्या सीमेवर सातत्याने पाकिस्तानी ड्रोन आणि क्वॉडकॉप्टर दिसून येत आहेत. यांचा वापर हेरगिरी, भारतीय सैनिकांची स्थिती जाणून घेणे तसेच शस्त्र आणि अमली पदार्थाच्या वाहतुकीसाठी केला जात आहे. यापूर्वीही जम्मू-काश्मीरच्या पीर पंजाल क्षेत्रात ड्रोनद्वारे दहशतवाद्यानां दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रs पाठविण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या.
मागील महिन्यात जम्मू आणि राजौरी जिल्हय़ात ड्रोनद्वारे पाठविण्यात आलेली शस्त्रास्त्रs हस्तगत करण्यात आली होती. जून महिन्यात जम्मू-काश्मीरच्य कथुआ येथील पनसर भागात बीएसएफने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केला होता. या ड्रोनद्वारे दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रs पाठविली जात होती. यात एक अमेरिकन रायफल, दोन मॅगजीन आणि अन्य शस्त्रास्त्रs होती.
आयएसआयचा कट
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेनजीक जम्मू-काश्मीरच्या आरएसपुरा आणि सांबा सेक्टरांमधील सुरक्षाकेंद्रांवर बॉम्ब पाडविण्यासाठी ड्रोनचा वापर करू शकतो, असा इशारा बीएसएफच्या गुप्तचर शाखेने ऑगस्ट महिन्यात दिला होता.
सैन्य अतिदक्षतेवर
पाकिस्तानकडून दहशतवाद्यांची घुसखोरी आणि त्याच्या बॉर्डर ऍक्शन फोर्सच्या हल्ल्यांची शक्यता पाहता भारतीय सैन्य अत्यंत दक्ष आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतीय क्षेत्रात घुसविण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु सीमेवर तैनात भारतीय सैनिक त्याचा कट उधळून लावत आहेत असे सैन्यप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनीच सांगितले होते. हिवाळय़ापूर्वी दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान आहे.