फोंडा : संजीवन फोंडा येथे अलीकडेच एका कार्यक्रमात डॉ. आशा सावर्डेकर यांच्या ’विंडो ?ान पंचायत, म्युनिसिपालिटीज गव्हर्नमेंट ?ाफ गोवा’या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन राजेंद्र केरकर आणि समृद्धी केरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राजेंद्र केरकर यांनी या कष्टपूर्वक निर्मित पुस्तकाची प्रशंसा केली. या पुस्तकात पंचायत आणि नगरपालिकांचे काम, त्यांचे नियम या विषयी विस्तृत विवेचन आहे. यावेळी व्यासपीठावर तुषार तोणगावकर, ज्योती कुंकळकर आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला जोडून इतर तीन महत्त्वाचे उपक्रमही राबविण्यात आले. त्यातील हिलदारी प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा. कचरा व्यवस्थापनासंबंधी या उपक्रमाचे उद्घाटन फोंडय़ाच्या नगराध्यक्ष गीताली तळावलीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कवळेचे सरपंच राजेश कवळेकर उपस्थित होते. या उपक्रमाच्या उपयुक्ततेबद्दल गीताली तळावलीकर आणि तुषार तोणगावकर यांनी सविस्तर विवेचन केले.
आशा सावर्डेकर दरवषी आपले यजमान कमांडर विश्वनाथ सावर्डेकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुरस्कार देत असतात. गेल्यावषी कचऱयाचे व्यवस्थापन करणाऱयांना वैयक्तिक पुरस्कार दिले होते. यंदा फोंडा मतदारसंघातील 25 सफाई कामगारांचा सन्मान करत एक चांगला पायंडा पाडला.
’कचऱयाचे व्यवस्थापन’या विषयावर मुलांसाठी घेतलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या मनोगतात आशाताई म्हणाल्या की, स्वच्छ गोवा हे माझे स्वप्न आहे. त्यासाठी खारीचा वाटा मी उचलत आहे. त्यासाठीच सफाई कामगारांचा सत्कार मी केला. आपल्या पुस्तकाविषयीही त्या बोलल्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कुंकळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संजीवनच्या उपाध्यक्ष अर्चना तेंडुलकर यांनी केले.