पणजी स.प.
51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फीः) उद्या (16 जानेवारी, 2021) होणाऱया उद्घाटन समारंभात इटालियन सिनेमॅटोग्राफर व्हिटोरिओ स्टोरारो यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
’द बर्ड विथ द क्रिस्टल प्लमेज’ (1970) या चित्रपटामुळे ते लोकप्रिय झाले. द कन्फर्मिस्ट (1970), लास्ट टँगो इन पॅरिस (1972), 1900 (1976), अपोकॅलिप्स नाऊ (1979), रेड्स (1981), द लास्ट एम्परर (1987), डिक टेसी (1990 ), कॅफे सोसायटी (2016) आणि वंडर व्हील (2017) यासारख्या चित्रपटांसाठी ते प्रसिद्ध आहेत.
स्टोरारो यांना अपोकॅलिप्स नाऊ (1979), रेड्स (1981) आणि द लास्ट एम्परर (1987) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत आणि तीन वेळा हा पुरस्कार जिंकलेल्या तीन हयात व्यक्तींपैकी ते एक आहेत .